Saif Ali Khan Attacked : सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर हल्ला झाल्याचे धक्कादायक वृत्त समोर येत आहे. बुधवारी रात्री १० वाजता त्याच्यावर चाकू हल्ला झाला. सैफ अली खान याच्या घरात घुसून एका अज्ञाताने हा हल्ला केल्याचे म्हटले जाते. गेले काही दिवस तो चोर सैफ अली खानच्या घराची टेहाळणी करत होता. चोरीच्या उद्देशाने तो अज्ञात व्यक्ती अभिनेत्याच्या घरात शिरला होता. पण त्याची चाहूल लागल्यामुळे घरामध्ये आरडा ओरड सुरु झाली. सैफ रात्री झोपला असताना अचानक आवाज झाल्याने त्याने बाहेर येऊन पाहिलं. तर चोर आणि सैफ अली खान एकमेकांच्या समोरासमोर आले. त्याचवेळी चोराने सैफवर चाकूने वार केले. (saif ali khan attacked with knife)
मिळालेल्या माहितीनुसार सैफची मुलं ज्या खोलीत झोपलेली त्यात खोलीत चोर उडी मारुन आला होता. चोराची चाहूल सैफच्या मुलांच्या नॅनीला झाली त्यामुळे तिन लगेचेच आरडाओरड सुरू केली. तेव्हा सैफला जाग आली आणि तो बाहेर आला. त्याक्षणी चोर आणि सैफ आमनेसामने आले. आपण पकडले जाऊ या भीतीने चोराने सैफवर हातात असलेल्या धारदार शस्त्राने वार करायला सुरुवात केली. यामध्ये सैफ बराच जखमी सुद्धा झाला आहे.
आणखी वाचा – 16 January Horoscope : गजकेसरी योगामुळे गुरुवारचा दिवस सुखदायक, तुमच्यासाठी कसा असेल दिवस? जाणून घ्या…
मुंबई पोलिसांचे डीसीपी म्हणाले, ‘अभिनेता सैफ अली खानच्या घरात अज्ञात व्यक्तीने घुसखोरी केली. तपास चालू आहे. अभिनेत्यावर उपचार सुरू आहेत. लीलावती हॉस्पिटलचे सीओओ डॉ. नीरज उत्तमानी यांनी सांगितले की, सैफ अली खानला त्याच्या वांद्रे येथील घरी अज्ञात व्यक्तीने भोसकले आणि त्याला पहाटे 3.30 वाजता आणण्यात आले. उत्तमनी यांनी सांगितले की, सैफला सहा जखमा आहेत. यापैकी एक पाठीच्या कण्याजवळ आहे. सध्या अभिनेत्यावर उपचार सुरु आहेत.
आणखी वाचा – सुप्रसिद्ध भोजपुरी अभिनेत्याचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन, कुटुंबियांवर कोसळला दुःखाचा डोंगर
सैफ अली खानच्या टीमने या प्रकरणाबाबत अधिकृत वक्तव्य शेअर केले आहे. सैफच्या टीमने सांगितले की, सैफ अली खानच्या घरी चोरीचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात शस्त्रक्रिया सुरू आहे. आम्ही मीडिया आणि चाहत्यांना धीर धरण्याची विनंती करतो. ही बाब पोलिसांची आहे. आम्ही तुम्हाला अपडेट ठेवू.