शनिवार, जून 20, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘सहा जखमा, दोन खोल जखमा आणि…”, हल्ल्यानंतर सैफ अली खानच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांकडून मोठी अपडेट, म्हणाले, “शस्त्रक्रिया…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जानेवारी 16, 2025 | 10:17 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Saif Ali Khan Health Update : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर काल रात्री त्याच्या घरी एका अज्ञात व्यक्तीने चाकूने हल्ला केला. सध्या या अभिनेत्यावर मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार सुरु आहेत. रुग्णालयाने अभिनेता कधी आणि कोणत्या वेळी रुग्णालयात पोहोचला आणि त्याची प्रकृती नेमकी कशी आहे याबद्दल एक निवेदन जारी करत अपडेट दिले आहे. लीलावती रुग्णालयाचे सीईओ डॉ. नीरज उत्मानी यांनी सांगितले की, 'सैफ अली खानवर त्यांच्या वांद्रे येथील निवासस्थानी एका अज्ञात व्यक्तीने चाकूने वार केले आणि त्यांना पहाटे ३.३० वाजता रुग्णालयात आणण्यात आले'.

'सहा जखमा, दोन खोल जखमा आणि…", हल्ल्यानंतर सैफ अली खानच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांकडून मोठी अपडेट, म्हणाले, "शस्त्रक्रिया…"

Saif Ali Khan Health Update : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर काल रात्री त्याच्या घरी एका अज्ञात व्यक्तीने चाकूने हल्ला केला. सध्या या अभिनेत्यावर मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार सुरु आहेत. रुग्णालयाने अभिनेता कधी आणि कोणत्या वेळी रुग्णालयात पोहोचला आणि त्याची प्रकृती नेमकी कशी आहे याबद्दल एक निवेदन जारी करत अपडेट दिले आहे. लीलावती रुग्णालयाचे सीईओ डॉ. नीरज उत्मानी यांनी सांगितले की, ‘सैफ अली खानवर त्यांच्या वांद्रे येथील निवासस्थानी एका अज्ञात व्यक्तीने चाकूने वार केले आणि त्यांना पहाटे ३.३० वाजता रुग्णालयात आणण्यात आले’.

उत्तमानी म्हणाले की, “सैफवर ६ जखमा होत्या आणि दोन खोल जखमा होत्या. यापैकी एक पाठीच्या कण्याजवळ आहे. न्यूरोसर्जन डॉ. नितीन डांगे, कॉस्मेटिक सर्जन डॉ. लीना जैन, भूलतज्ज्ञ डॉ. निशा गांधी, डॉ. उत्तममणी यांच्या नेतृत्वाखालील डॉक्टरांची एक टीम त्यांच्यावर शस्त्रक्रिया करत आहे”. सैफ अली खानच्या घरी चोरीचा प्रयत्न झाला. सध्या सैफवर रुग्णालयात शस्त्रक्रिया सुरु आहे. पोलिसांनी मीडिया आणि चाहत्यांना धीर धरण्याची विनंती केली आहे, अभिनेत्याच्या तब्येतीबाबत ते अपडेट देत राहतील असेही त्यांनी कळवले आहे.

आणखी वाचा – धक्कादायक! सैफ अली खानवर चाकू हल्ला, घरात घुसून ज्ञातांकडून अनेकदा वार, रुग्णालयात उपचार सुरु

चोरट्यांनी प्रथम घरातील मोलकरणीवर हल्ला केला. मोलकरीण आणि हल्लेखोर यांच्यातील हाणामारी ऐकून सैफ त्याच्या खोलीतून बाहेर आला. त्यानंतर हल्लेखोराने त्याच्यावर हल्ला केला. सैफच्या मोलकरणीच्या हाताला दुखापत झाली आहे आणि तिची चौकशी सुरु आहे. पोलिसांनी सांगितले आहे की, सैफच्या घरात जबरदस्तीने प्रवेश केल्याचा कोणताही पुरावा नाही. सीसीटीव्हीमध्ये कोणतीही एंट्री दिसत नाही. तो व्यक्ती घरात कसा घुसला याचा तपास करण्यासाठी पोलिस सैफच्या घरी आहेत.

आणखी वाचा – सुप्रसिद्ध भोजपुरी अभिनेत्याचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन, कुटुंबियांवर कोसळला दुःखाचा डोंगर

सैफ अली खानने या प्रकरणाबाबत सांगितले की, काल रात्री तो घरी असताना अचानक कोणीतरी त्याच्यावर हल्ला केला. करीना कपूर आणि मुले तिथे होती आणि ते सुद्धा ही घटना पाहून घाबरले. हल्लेखोराने त्याच्यावर तीन वेळा हल्ला केला. दुखापतीमुळे तो त्याला हरवू शकला नाही. तर इतर नोकर झोपले होते. बाकी सर्व लोक आपापल्या घरी होते. नंतर तो माणूस पळून गेला आणि रात्र असल्याने सैफला त्याचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता.

Tags: bollywood newssaif ali khansaif ali khan health update
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

 kanika maheshwari faced harassment
Entertainment

अश्लील इशारे, घाणेरडी नजर आणि…; १३व्या वर्षी अभिनेत्रीसह घडला वाईट प्रकार, म्हणाली…

जून 20, 2026 | 1:00 pm
Raghavendra Rao Viral Video
Entertainment

दिग्दर्शकाचा स्वतःवरचा ताबा सुटला?, अभिनेत्रीला जवळ ओढलं आणि…; व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांचा संताप

जून 20, 2026 | 11:30 am
sunil grover sleeps on footpath
Entertainment

थेट फुटपाथवर चादर पसरून रात्र काढली, सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याला पाहून नेटकरी अवाक, म्हणाले

जून 20, 2026 | 9:40 am
 taarak mehta ka ooltah chashmah bagha
Entertainment

सीनदरम्यानच ढसाढसा रडू लागला बाघा, आईच्या आठवणीत पाणावले डोळे, निर्मात्यांनी सांभाळलं

जून 19, 2026 | 9:48 am
Next Post
Bollywood Actor Saif Ali Khan Attacked At Home

सैफ अली खानवर अज्ञातांनी घरात घुसून चाकू हल्ला नेमका कसा केला?, 'त्या' रात्री असं काय काय घडलं?, संपूर्ण घटनाक्रम समोर

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.