‘होणार सून मी या घरची’ मालिकेतून शशांक केतकर अधिक प्रकाशझोतात आली. या मालिकेमध्ये त्याने श्री ही भूमिका साकारली होती. या भूमिकेला प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले. घराघरात त्याने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. शशांकने आतापर्यंत अनेक मालिका व चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारल्या आहेत. सध्या तो ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘मुरांबा’ या मालिकेमध्ये दिसून येत आहे. अभिनयाबरोबरच तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून तो आपल्या चाहत्यांची नेहमी संवाद साधत असतो. अनेक व्हिडीओ तसेच फोटो तो चाहत्यांबरोबर शेअर करत असतो. (shashank ketkar on son)
शशांक २०१७ साली प्रियंका ढवळेबरोबर लग्नबंधनात अडकला. त्याला ऋग्वेद नावाचा मुलगा आहे. शशांक त्याच्या मुलाबरोबर धमाल मस्ती करतानाचे अनेक व्हिडीओ शेअर करत असतो.नुकताच त्याने एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तो त्याच्या मुलाचे प्रताप सांगत आहे. तो या व्हिडीओमध्ये घरात मुलं असण्याची लक्षण सांगत आहे. तो या व्हिडीओमध्ये सांगत आहे की, “घरात लहान मुलं असण्याची टिपिकल लक्षण! मी सकाळपासून माझे इयरफोन शोधत होतो. घरभर शोधले पण मिळाले नाहीत. मी इयरफोन ऑर्डरदेखील करणार होतो. मात्र तेवढ्यात माझी नजर खिडकीत गेली आणि वाकून पाहिले असता इयरफोन खाली पडलेले दिसून आले. ऋग्वेदची काही खेळणी व माझे इयरफोन खाली पडले आहेत”.
सदर व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करत त्याने, “आय लव्ह यु ऋग्वेद. पण माझे इयरफोन्स का आणि कुठे टाकलेस?” असे लिहिले आहे. या व्हिडीओमध्ये शशांकचा मजेशीर अंदाज बघायला मिळत आहे. तसेच त्याच्या व्हिडीओला प्रेक्षकांची खूप पसंतीदेखील मिळत आहे. त्याचप्रमाणे या व्हिडीओवर अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
एका नेटकऱ्याने लिहिले आहे की, “बाललीला किती मजेशीर असतात. इतके होऊनही तुझा शांतपणा, सहनशीलता खरच कौतुकास्पद आहे. एखाद्या बाळावर आई-वडील किती रागावले असते”, दुसरा नेटकरी लिहितो की, “ही तर आताशी सुरुवात आहे”. शशांकच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर सध्या तो ‘मुरांबा’ या मालिकेमध्ये मुख्य भूमिका करताना दिसत आहे.