शनिवार, जुलै 25, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

एअरपोर्टवर कुटुंबीयांकडून जंगी स्वागत, भावुक झाल्या अन्…; ‘कान्स’नंतर भारतात परतल्या छाया कदम, म्हणाल्या, “आता चिकन-भाकरी…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मे 29, 2024 | 10:08 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Chhaya kadam return to india

एअरपोर्टवर कुटुंबीयांकडून जंगी स्वागत, भावुक झाल्या अन्...; 'कान्स'नंतर भारतात परतल्या छाया कदम, म्हणाल्या, "आता चिकन-भाकरी…"

सध्या सर्वत्र कान्स फिल्म फेस्टिव्हलची चर्चा सुरु असलेली पाहायला मिळत आहे. यंदाच्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. तब्बल तीन दशकांनंतर एका भारतीय चित्रपटाला कान्स महोत्सवात नामांकन मिळाले आहे. ‘All We Imagine As Light’ या भारतीय चित्रपटाला कान्समध्ये नामांकन मिळाले आहे. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या श्रेणीत पाल्मे डी’ओर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे. या चित्रपटात मराठमोळ्या अभिनेत्रीचा गौरव झालेला पाहायला मिळाला. ही अभिनेत्री म्हणजे छाया कदम. (Chhaya kadam return to india)

कान्स महोत्सवात झालेल्या कौतुकामुळे छाया कदम चर्चेत आलेल्या पाहायला मिळाल्या. ‘All We Imagine As Light’ या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेचं कौतुक केलं जात आहे. छाया कदम यांच्या ‘All We Imagine As Light’ या चित्रपटाचा कान्स चित्रपट महोत्सवात प्रीमियर झाला आणि या चित्रपटाचा प्रीमियर संपल्यानंतर उपस्थितांनी त्यांना उभं राहून मानवंदना दिली. टाळ्यांच्या कडकडाटात सर्वांनी अभिनेत्रीचे कौतुक केले. यावेळी त्या भावुक होत आनंदाने थिरकतानाही दिसल्या.

आणखी वाचा – पारू-आदित्यचा शाही विवाहसोहळा संपन्न, ऍड शूटसाठी केलेलं लग्न मालिकेत कोणतं वळण घेणार?, नवा ट्विस्ट

View this post on Instagram

A post shared by Majja (@its.majja)

‘कान्स फिल्म फेस्टिव्हल’मध्ये गौरव झाल्यानंतर आता छाया कदम मायदेशी परतल्या आहेत. मायदेशी परतल्यानंतर आता छाया कदम यांचं एअरपोर्टवरच कौतुक केलं गेलं. अनेकांनी एअरपोर्टवर येत त्यांचं स्वागत केलं आणि त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी इट्स मज्जासह साधलेल्या संवादात छाया कदम यांनी मायदेशी परतल्यानंतर त्यांना कसं वाटत आहे आणि त्या काय मिस करत होत्या याबद्दल बोलल्या.

आणखी वाचा – बुधवारचा दिवस कर्क व धनू राशीसाठी लाभदायक, कुटुंबात येणार नवीन सदस्य, तुमच्या नशिबात नेमकं काय?

यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, “खूप मस्त वाटतंय. कधी कान्सपर्यंत पोहेचेन असा विचारही केला नव्हता. खूप भारी वाटतंय. मी कान्स मध्ये होते तेव्हा इथल्या जेवणाला खूप मिस केलं. आपल्या इथल्यासारखं जेवण तिथे मिळतं नाही. आज विमानात बसले तेव्हा भात पाहिला आणि माझ्या डोळ्यात पाणी आलं. मी इथून जाताना वरण-भात खाल्लं होतं त्यानंतर आज परतीच्या प्रवासात विमानात खाल्लं. आणि उद्या तर मी माझ्या आवडीचं चिकन भाकरी सर्व खाणार आहे”.

Tags: cannes film festivalchhaya kadamChhaya kadam return to indiamarathi actress
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bhootam Bhayam
Entertainment

‘भूतम भयम्’मध्ये आणखी एक सरप्राईज, प्रियदर्शन जाधव साकारतोय रहस्यमय ‘मया’

जुलै 24, 2026 | 5:20 pm
Bhagyashree Nhavale Periods Awareness
Entertainment

“मी अजूनही बाजूला बसते”, मासिक पाळीबाबत अभिनेत्रीने मांडली तिची बाजू, म्हणाली, “देवाला जाणं…”

जुलै 24, 2026 | 11:11 am
salman khan appeal students at jantar mantar
Entertainment

“कृपया घरी परत जा”, जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सलमान खानचे भावनिक आवाहन, म्हणाला, ” पंतप्रधान मोदी…”

जुलै 24, 2026 | 10:15 am
parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Next Post
Tharal Tar Mag Serial Update

प्रियामुळे सायली-अर्जुनचा महत्त्वाचा पुरावा येणार धोक्यात?, साक्षी-महीपत विरोधात केसमध्ये अडथळा निर्माण होणार का?, नेमकं काय घडणार?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.