बॉलिवूडमध्ये पाऊल टाकल्यानंतर ‘दंगल’, ‘सिक्रेट सुपरस्टार’ आणि ‘द स्काय इज पिंक’सारखे चित्रपट केल्यानंतर अभिनेत्री झायरा वसीम हिने इंडस्ट्रीला कायमचा निरोप दिला. यानंतर आता इंडस्ट्रीपासून दूर असलेल्या झायराच्या वैयक्तिक आयुष्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. झायरा वसीमच्या घरावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. वडिलांच्या निधनाबद्दल तिने सोशल मीडियावर एक दुःखद पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टद्वारे तिने तक्रारही केली आहे. (Zaira Wasim Father Death)
झायरा वसीमने तिच्या वडिलांच्या निधनाची दु:खद बातमी सोशल मीडियावर शेअर केली आहे. याबाबत तिने एक लांबसडक पोस्ट शेअर केली आहे. त्याच्या या पोस्टवर चाहतेही प्रतिक्रिया देत आहेत. या पोस्टमधून तिने तक्रारही केलेली पाहायला मिळत आहे. झायराने एक अत्यंत दुःखद पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये तिने लिहिले आहे की, “माझे वडील जाहिद वसीम यांचे निधन झाले आहे. कृपया त्यांना आपल्या प्रार्थनेत लक्षात ठेवा आणि अल्लाहकडे प्रार्थना करा की त्यांच्या उणीवा माफ करा. त्यांना वेदनांपासून वाचवा. इथून पुढे त्यांचा प्रवास सुलभ करा आणि त्यांना स्वर्गात सर्वोच्च स्थान द्या”.

झायरा वसीमने मंगळवारी रात्री ही पोस्ट शेअर केली होती. ज्यामध्ये तिने तिच्या दिवंगत वडिलांसाठी प्रार्थना केलेली पाहायला मिळाली. अनेकांनी अभिनेत्रीच्या या पोस्टवर कमेंट करत “तुमच्या कुटुंबाला या दु:खाला सामोरे जाण्यासाठी धैर्य देवो”, “या दुःखाच्या वेळी कुटुंबाला धैर्य देवो”, असं म्हणत सांत्वन केलं आहे.
आमिर खानबरोबर ‘दंगल’, म्युझिकल-ड्रामा ‘सिक्रेट सुपरस्टार’ आणि ‘द स्काय इज पिंक’ सारख्या उल्लेखनीय चित्रपटांमध्ये झळकलेली झायरा वसीमने काही चित्रपटांनंतरच इस्लाममुळे अभिनय जगताचा निरोप घेतला. प्रियांका चोप्रा आणि फरहान अख्तर यांचा ‘द स्काय इज पिंक’ हा तिचा शेवटचा चित्रपट होता. झायराने इस्लामसाठी ग्लॅमरचे जग कायमचे सोडले. २३ वर्षीय झायराने २०१६ मध्ये आमिर खानच्या ‘दंगल’ या चित्रपटातून बालकलाकार म्हणून तिच्या करिअरची सुरुवात केली होती. या चित्रपटात तिने छोट्या ‘गीता फोगट’ची भूमिका साकारली होती.