आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर तापसी पन्नू हीने बॉलिवूडमध्ये आपले स्वतःचे एक वेगळे अस्तित्त्व निर्माण केले आहे. काही दिवसांपूर्वी तिने बॉयफ्रेंड मॅथियस बरोबर लग्न केल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. मात्र तिच्या लग्नाचे फोटो व व्हिडीओ आतापर्यंत सर्वांच्या समोर आले नव्हते. पण आता त्यांच्या लग्नाचा एक व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तापसी खूप धमाल करताना दिसत आहे. (taapsee pannu wedding video)
उदयपूर तापसी व मॅथियस यांनी अगदी शाही थाटात लग्न केले. या व्हिडीओमध्ये तापसी एका पारंपारिक पंजाबी ड्रेसमध्ये दिसून येत आहे. तिने लाल रंगाचा ड्रेस परिधान केला असून लाल रंगाचा चुडा, काळा चष्मा अशा खास अंदाजात तिने एंट्री घेतली. तसेच ‘इथ्थे प्यार कि पुछ होई ना, तेरे नाल नय्यो बोलना, तेरे मुह ते मुछ कोई ना’ या पंजाबी गाण्यावर तिने डान्स करत एंट्री केली.
स्टेजकडे येत असताना तापसिने मॅथियसचा हात पकडला होता. मॅथियसने देखील शेरवानी परिधान केली होती. तसेच पगडीदेखील परिधान केली होती. लग्नस्थळी येताच दोघांनी एकमेकांना मिठी मारली होती. दोघांनीही पंजाबी गाण्यावर डान्स केला. सदर व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
दरम्यान तापसीने लग्नाबद्दल कमालीची गुप्तता पाळली होती. टीम इंडियाचा बॅडमिंटन दुहेरी संघाचा प्रशिक्षक असलेला प्रियकर मॅथियास बोबरोबर मागील १० वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होती आणि अखेर त्यांनी लग्न केले. तापसीने तिच्या प्रियकराबरोबरचे नाते कधीच लपवले नाही. ती प्रत्येकवेळी त्याच्याबरोबरचे काही खास फोटो सोशल मीडियाद्वारे पोस्ट करत असते. तापसी पन्नू ही केवळ हिंदीच नाही तर तेलुगू व तमिळ चित्रपटसृष्टीतीलही प्रसिद्ध चेहरा आहे. अभिनेत्रीने मॉडेलिंगपासून तिच्या अभिनयाची सुरुवात केली होती. तापसीने ‘जुडवा २’, ‘बदला’, ‘नाम शबाना’, ‘पिंक’ व ‘शाबाश मिठू’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तापसीच्या लग्नाच्या व्हिडीओला सर्वांची खूप पसंती मिळत आहे.