शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सुप्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्याचा दोन लेकींसह विमान अपघातात धक्कादायक मृत्यू, हृदय पिळवटून टाकणारी घटना, फिरायला गेला होता अन्…

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 6, 2024 | 11:44 am
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
(hollywood actor actor christian oliver dies along with two daughters in caribbean plane crash

सुप्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्याचा दोन लेकींसह विमान अपघातात धक्कादायक मृत्यू, हृदय पिळवटून टाकणारी घटना, फिरायला गेला होता अन्...

हॉलिवूडमधून एक दु:खद बातमी समोर येत आहे. हॉलिवूड अभिनेता ख्रिश्चन ऑलिव्हर व त्याच्या दोन मुलींचे अपघाती निधन झाल्याचे वृत्त समोर आले आहे. स्थानिक पोलिसांच्या अहवालानुसार, अभिनेत्याचे छोटे विमान टेकऑफच्यावेळी काही क्षणांतच कॅरेबियन समुद्रात कोसळले. गुरुवारी एका छोट्या खासगी विमानाने प्रवास करत असताना, हा अपघात घडला आणि या अपघातात अभिनेत्यासह त्याच्या दोन्ही मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. (Christian Oliver Death News)

यावेळी स्थानिक पोलिसांच्या मदतीने तिथे उपस्थित असलेल्या मच्छीमार व तटरक्षकांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून, चारही मृतदेह बाहेर काढले आहेत. या विमानाने प्रवास करत असलेला ५१ वर्षीय अभिनेता ख्रिश्चन ऑलिव्हर, त्याच्या मुली मदिता (१० वर्षे) व अ‍ॅनिक (१२ वर्षे) यांच्यासह पायलट रॉबर्ट सॅक्स यांचादेखील अपघाती मृत्यू झाला आहे. त्यांचे हे विमान ग्रेनेडाइन्समधील बेकिया या छोट्या बेटावरून गुरुवारी मध्यरात्रीनंतर सेंट लुसियाला जाणार होते. पण टेकऑफच्यावेळी कॅरेबियन समुद्रात त्यांचे विमान कोसळले.

View this post on Instagram

A post shared by Christian Oliver (@christianoliverofficial)

आणखी वाचा – “आगीत तेल ओततात पण…”, ‘बिग बॉस’ स्क्रिप्टेड असण्याच्या चर्चांवरुन पुष्कर जोगचा खुलासा, म्हणाला, “त्या घरात…”

नुकतंच ख्रिश्चन ऑलिव्हर याने इन्स्टाग्रामवर समुद्रकिनाऱ्याचा फोटो व त्याला हटके कॅप्शन देत आपण कुटुंबाबरोबर सुट्टीवर असल्याची माहिती दिली होती. नवीन वर्षानिमित्त ऑलिव्हर त्याच्या परिवारासह सुट्टीवर गेला होता आणि याचे काही खास क्षण त्याने सोशल मीडियावर शेअर केले होते. त्याच्या निधनाच्या बातमीने मनोरंजनसृष्टीसह चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे.

आणखी वाचा – “आगीत तेल ओततात पण…”, ‘बिग बॉस’ स्क्रिप्टेड असण्याच्या चर्चांवरुन पुष्कर जोगचा खुलासा, म्हणाला, “त्या घरात…”

दरम्यान, ऑलिव्हर हा टॉम क्रूझच्या ‘वाल्कीरी’ या चित्रपटामध्येही झळकला होता. त्याच्या ‘सेव्ह बाय द बेल: द न्यू क्लास’ आणि चित्रपट ‘द बेबी-सिटर्स क्लब’मध्ये साकारलेल्या भूमिका खूप गाजल्या होत्या. ऑलिव्हरने लोकप्रिय जर्मन कॉप शो ‘अलार्म फर कोब्रा ११’च्या दोन सीझन्समध्ये काम केले होते.

Tags: Christian OliverChristian Oliver Death Newsdeath newshollywood actorhollywood news
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
actress mrunmayi deshpande harvesting in the field with her husband swapnil rao video shared on instagram

Video : महाबळेश्वरमध्ये शेतात नवऱ्यासह काम करतेय मृण्मयी देशपांडे, स्ट्रॉबेरीचीही करतात शेती, व्हिडीओ शेअर करत दाखवली संपूर्ण झलक

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.