‘अनुपमा’ या मालिकेने देशभरातील प्रेक्षकांच्या मनात आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. या मालिकेमध्ये मुख्य भूमिका सकारणारी अनुपमा म्हणजे रुपाली गांगुली ही सतत अभिनयाबरोबरच इतर अनेक कारणांमुळे चर्चेत असते.काही दिवसांपूर्वी तिचा एअरपोर्टवर नवऱ्याच्या पाया पडतानाचा व्हिडीओदेखील तुफान व्हायरल झाला होता. त्यावर चाहत्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया देखील आल्या होत्या. त्यावर रुपालीने देखील चाहत्यांना उत्तरं दिली होती. आशातच आता ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. (rupali ganguly join BJP)
एका आदर्श गृहिणीची भूमिका करणारी रुपाली एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे. अभिनयाबरोबरच ती आता राजकारणातदेखील सक्रिय असलेली पाहायला मिळणार आहे. रुपालीने भाजप पक्षात प्रवेश केला असून तिच्या चाहत्यांना आश्चर्याचा मोठा धक्का बसला आहे. याबाबतची घोषणा काही वेळापूर्वी करण्यात आली आहे. राजकारणातील प्रवेशानंतर तिने आता माध्यमांबरोबर संवाद साधला आहे. राजकारणातील प्रवेशाबद्दल ती म्हणाली की, “एक नागरिक म्हणून आपण यांमध्ये सहभागी झाले पाहिजे. महाकाल व माताराणीचा माझ्यावर आशीर्वाद आहे की मी कलेच्या माध्यमातून लोकांसमोर येते. पण मी जेव्हा देशाचा विकास होताना पाहते तेव्हा यांमध्ये मलाही सहभागी व्हावेसे वाटते”.
#WATCH | Actress Rupali Ganguly joins BJP at the party headquarters in Delhi
— ANI (@ANI) May 1, 2024
She says, "…When I see this 'Mahayagya' of development, I feel that I should also take part in this…I need your blessings and support so that whatever I do, I do it right and good…'' pic.twitter.com/x7pT7oq0xB
पुढे ती म्हणाली की, “पंतप्रधान मोदी यांनी सांगितलेल्या मार्गावर मी चालून देशाची सेवा करेन यासाठी मी इथे आले आहे. अमित शहा यांच्या नेतृत्त्वाखाली मी पुढे जाऊ शकेन. मी असे काम करेन ज्यामुळे भाजपला माझ्या वर गर्व वाटेल. यासाठी मला तुम्हा सगळ्यांचा आशीर्वाद हवा आहे. मी जे करेन ते चांगले करेन. काही चुकलं तर मला नक्की सांगा”.
दरम्यान रुपालीच्या राजकारणातील प्रवेशामुळे सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. नेटकऱ्यांनीदेखील तिच्या राजकारणातील प्रवेशावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहिले आहे की, “ही पुढची स्मृति इराणी होणार”, दुसऱ्या नेटकाऱ्याने लिहिले आहे की, “आता अनुपमा इथेही ड्रामा करणार! करियर संपलं”, तसेच अजून एका नेटकऱ्याने लिहिले आहे की, “हेमा मालिनी यांची भविष्यातील रिप्लेसमेंट”. रुपलीच्या राजकारणातील प्रवेशाचा भाजपला किती फायदा होत आहे हे आता पाहण्यासारखे आहे.