सोमवार, ऑगस्ट 31, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

न्यायालयानं समीर वानखेडेंची याचिका फेटाळली; आर्यन खानविरोधात केला होता मानहानीचा दावा, नेमकं प्रकरण काय?

Majja Webdeskby Majja Webdesk
जानेवारी 29, 2026 | 4:08 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Sameer Wankhede Defamation

उच्च न्यायालयानं समीर वानखेडेंची याचिका फेटाळली

Sameer Wankhede Defamation : माजी एनसीबी अधिकारी आणि आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांना दिल्ली उच्च न्यायालयानं मोठा धक्का दिला आहे. अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या ‘द बॅड्स ऑफ बॉलिवूड’ या नेटफ्लिक्स सीरिजविरोधात समीर वानखेडे मानहानीचा दावा दाखल केला होता. तर न्यायालयानं समीर वानखेडेंचा हा दावा फेटाळून लावला आहे. समीर वानखेडे यांनी अभिनेता शाहरूख खानच्या प्रोडक्शन बॅनर रेड चिलीज एंटरटेन्मेंट प्रायव्हेट लिमिटेड आणि स्ट्रीमिंग जायंट नेटफ्लिक्सविरोधात मानहानाची याचिका केली होती. द बॅड्स ऑफ बॉलिवूड या वेब सिरीजमधील भूमिकेवरून ही याचिका करण्यात आली होती.

आणखी वाचा: ‘बिग बॉस’ फेम विजेता स्पर्धकाचा संसार मोडला? चाहत्यांमध्ये ‘त्या’ पोस्टमुळे चर्चांना उधाण

समीर वानखेडे यांनी द बॅड्स ऑफ बॉलिवूड या वेब सिरीजमधील काही दृष्यांना स्थगिती देण्यासाठी न्यायालयाकडे धाव घेतली होती. या वेबसीरिजमधून समीर वानखेडेंची खिल्ली उडवण्यात आली होती असा दावा त्यांनी केला. बदनामी केल्याप्रकरणी त्यांनी निर्मात्यांवर २ कोटी रुपयांचा मानहानीचा दावा केला होता. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोत असताना समीर वानखेडे यांनी २०२१ मध्ये मुंबईतील क्रूझ ड्रग्स छाप्याचे नेतृत्व केले होते. यात अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानला अटक करण्यात आली होती. (Sameer Wankhede Defamation)

आणखी वाचा: “आता या पोरक्या सूरजने कोणाकडे बघायचं”, अजित दादांच्या चितेजवळ डोकं ठेऊन रडला सूरज; म्हणाला, “मला सोडून…”

‘द बॅड्स ऑफ बॉलिवूड’ या सीरिजमध्ये समीर वानखेडे यांच्यासारखे दिसणारे एक पात्र दाखवण्यात आले. या सीरिजमधून सार्वजनिक प्रतिष्ठा मलिन करण्यात आल्याचा आरोप समीर वानखेडे यांनी केला. त्याने शाहरूख खान आणि गौरी खान यांच्यासह मालकीच्या रेड चिलीज एंटरटेन्मेंट आणि नेटफ्लिक्सकडून २ कोटी रुपयांची भरपाई मागितली. तसंच, या सीरिजमधील आक्षेपार्ह चित्रण काढण्याचा आदेश देण्याची मागणी करण्यात आली. (Sameer Wankhede Defamation)

Tags: aryan khannetflixSameer WankhedeSameer Wankhede Defamationshah rukh khan
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Rajat Bedi Marathi Movie
Entertainment

बॉलिवूडनंतर रजत बेदींची मराठी सिनेमात एन्ट्री; ‘बंधू’ चित्रपटातून नवी इनिंग

ऑगस्ट 31, 2026 | 4:24 pm
Jayanti 2 Trailer
Entertainment

‘जयंती २’मधून उलगडणार कॉलेजमधील भेदभावाची गोष्ट, ट्रेलर पाहून वाढली उत्सुकता, ११ सप्टेंबरपासून जवळच्या सिनेमागृहात

ऑगस्ट 31, 2026 | 12:49 pm
Nikki Arbaaz breakup news
Entertainment

निक्की-अरबाजमध्ये नेमकं काय बिनसलं?, एकमेकांना अनफॉलो केलं अन्…; पोस्टमुळे चर्चांना उधाण

ऑगस्ट 31, 2026 | 10:22 am
Heavy Weight Lifting
Entertainment

कोणत्या प्रकारच्या व्यायामामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो? जाणून घ्या आणि व्हा सावध

ऑगस्ट 29, 2026 | 10:14 am
Next Post
Emraan hashmi son cancer

"लघवीत रक्त होतं आणि…", सुप्रसिद्ध गायकाच्या लेकाला झालेला कॅन्सर, केमोथेरपी आणि ऑपरेशननं आयुष्यच उद्ध्वस्त झालं अन्...

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.