बुधवार, सप्टेंबर 9, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

हार्दिक जोशीने कोल्हापूरमध्ये सुरु केला स्वतःचा व्यवसाय, मिसळचाही आनंद लुटता येणार, नेमकं कुठे सुरु केलं आहे हॉटेल?

Saurabh Moreby Saurabh More
मार्च 8, 2024 | 1:09 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
Hardeek joshi start new outlet of ranada thandai in Kolhapur actor shared the video

हार्दिक जोशीने कोल्हापूरमध्ये सुरु केला स्वतःचा व्यवसाय, मिसळचाही आनंद लुटता येणार, नेमकं कुठे सुरु केलं आहे हॉटेल?

मनोरंजन सृष्टीत असे अनेक कलाकार आहेत, जे अभिनयाव्यतिरिक्त उद्योग क्षेत्रातही आपला एक वेगळा ठसा उमटवत आहेत. मराठी नाटक, मालिका किंवा चित्रपट या माध्यमांद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याव्यतिरिक्त ही कलाकार मंडळी स्वत:च्या व्यवसायातही आपली एक वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. सुप्रिया पाठारे, निरंजन कुलकर्णी, अभिज्ञा भावे, तेजस्विनी पंडित, प्रार्थना बेहरे, यशोमान आपटे, श्रेया बुगडेसारख्या अनेक कलाकारांनी स्वत:चा छोटासा का होईना उद्योग सुरु केला आहे.

अशातच आता यात आणखी एका अभिनेत्याची भर पडली आहे आणि हा अभिनेता म्हणजे हार्दिक जोशी. हार्दिकने काही वर्षांपूर्वी स्वत:चा एक फूड ब्रँड सुरू केला होता. हार्दिकने ‘राणादा थंडाई’ म्हणून स्वत;चा एक ब्रॅंड सुरु केला होता. त्याच्या या नवीन व्यवसायाला चाहत्यांकडून तूफान प्रतिसाद मिळाला. त्यामुळे खवय्यांची मिळणारी वाढती पसंती पाहून आता त्याच्या व्यवसायाबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

View this post on Instagram

A post shared by Ranada Foods (@ranada_foods)

हार्दिकने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करत त्याच्या राणादा फुड्सच्या नवीन ब्रांच बद्दल सांगितलं आहे. “नमस्कार मंडळी… कोल्हापुरातील राजारामपुरी येथे माऊलीच्या पुतळ्याजवळ ‘राणादा फूड्स’चं नवीन आऊटलेट आम्ही सुरू करणार आहोत. याठिकाणी खवय्यांना बदाम थंडाई, मिसळ आणि शेगावची सुप्रसिद्ध कचोरी या पदार्थांचा आस्वाद घ्यायला मिळेल. तर नक्की या!” असं म्हणत त्याने माहिती दिली आहे.

आणखी वाचा – कोणी कपडे तर कोणी लायटरवरुन बोललं; इन्स्टाग्रामवर लाइव्ह आल्यानंतर नशा करत राहिला आमिर खान, नेटकऱ्यांचाही संताप, नेमकं काय घडलं?

हार्दिकच्या ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतील भूमिकेमुळे थंडाई प्रसिद्ध झाली असं म्हटलं तर वावगं होणार नाही. या मालिकेत तो पहिलवानच्या भूमिकेत दाखवण्यात आला असून यात तो सतत थंडाई घेत होता. त्यामुळे त्याला या थंडाईच्या नवीन व्यवसायाबदल कल्पना सुचली असून खवय्यांकडूनही त्याला चांगलाच प्रतिसाद मिळत आहे.

आणखी वाचा – बहिणीच्या निधनानंतर काही तासांतच अभिनेत्री डॉली सोहीने सोडला जीव, तिलाही झाला होता गंभीर आजार, कुटुंबाला दु:ख सहन होईना

दरम्यान, हार्दिकने तुझ्यात जीव रंगला मालिकेनंतर अनेक मालिका केल्या. सध्या तो स्टार प्रवाह वहिनीवरील तुझेच मी गीत गात आहे या मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. तसेच त्याने काही चित्रपटांतदेखील महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.   

Tags: मनोरंजन बातमीमराठी अभिनेतामराठी मनोरंजन बातमीमराठी बातमीहार्दिक जोशीentertainment newshardeek joshimarathi actormarathi entertainment newsMarathi news
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Kaakul Marathi Movie
Entertainment

‘काकुळ’च्या थरारक रहस्याचा उलगडा होणार नोव्हेंबरमध्ये, मोनालिसा बागलची प्रमुख भूमिका

सप्टेंबर 9, 2026 | 9:50 am
Dashami Movie Song
Entertainment

‘बुरी नजर वाले.. तेरा मुँह काला’ चा स्वॅग, ‘दशमी’ चित्रपटाचं हटके गाणं चर्चेत

सप्टेंबर 9, 2026 | 9:40 am
Daryabhavani Marathi Movie
Entertainment

‘दर्याभवानी’ साठी दिग्पाल लांजेकरांचे अनोखं गाऱ्हाणं, शूटिंगला सुरुवात, होणार ‘या’ दिवशी प्रदर्शित

सप्टेंबर 9, 2026 | 9:32 am
Bandhkhor Marathi Movie
Entertainment

सहा स्त्रियांच्या बंडाची कहाणी उलगडणार ‘बंडखोर’मधून, सुनेत्रा अजित पवार आणि सुनील गावस्कर यांच्या उपस्थितीत ट्रेलर प्रदर्शित

सप्टेंबर 8, 2026 | 1:48 pm
Next Post
Salman Khan Viral Video

Video : चाहत्याने व्हिडीओ करताच स्वतःच्या रागावर संयम ठेवू शकला नाही सलमान खान, हाताने इशारा केला अन्…; व्हिडीओ व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.