गुरूवार, सप्टेंबर 10, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

बहिणीच्या निधनानंतर काही तासांतच अभिनेत्री डॉली सोहीने सोडला जीव, तिलाही झाला होता गंभीर आजार, कुटुंबाला दु:ख सहन होईना

Saurabh Moreby Saurabh More
मार्च 8, 2024 | 10:33 am
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
Dolly sohi sister Amandeep died of jaundice see the details

बहिणीच्या निधनानंतर काही तासांतच अभिनेत्री डॉली सोहीने सोडला जीव, तिलाही झाला होता गंभीर आजार, कुटुंबाला दु:ख सहन होईना

हिंदी मनोरंजन विश्वातून नुकतीच एक दु:खद बातमी समोर आली आहे. छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री डॉली सोहीचे निधन झाले आहे. अभिनेत्री गेल्या काही दिवसांपासून गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाशी लढा देत होती. मात्र तिच्या या लढ्याला अपयश आले असून तिची या लढ्याची झुंज अखेर अपयशी ठरली आहे. अशातच अभिनेत्रीची लहान बहीणीचेहे निधन झाल्याचे वृत्त समोर येत आहे. (Dolly Sohi Sister Amandeep Sohi Death)

डॉलीची बहीण अमनदीप हिनेदेखील डॉलीच्या निधनाच्या काही तास आधीच या जगाचा निरोप घेतला. अमनदीपला कावीळ झाली असल्याचे वृत्त समोर आले असून तिला यावर उपचार घेण्यासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र तिच्या शरीरातील कावीळची गुंतागुंत ही अधिकच वाढत गेली. त्यामुळे तिची किडनी निकामी झाली आणि तिच्या शरीराने प्रतिसाद बंद केला. अखेर अमनदीपला या जगाचा निरोप घ्यावा लागला.  

View this post on Instagram

A post shared by Dolly Sohi (@dolly_sohi)

अमनदीप सोहीचे काल, गुरुवार ७ मार्च रोजी निधन झाले. त्याने ‘ETimes’च्या वृत्तानुसार, तिचा भाऊ मनू सोहीने अमनदीपच्या निधनाचे वृत्त देताना असं म्हटलं की, “हो, हे खरं आहे. अमनदीप आता आपल्यात नाही. तिला कावीळ झाली होती आणि कावीळमुळे तिची किडनी निकामी झाली. त्यामुळे तिचे निधन झाले. पण डॉक्टरांना तिच्याबद्दल सविस्तर विचारण्यासाठी आम्ही सध्या त्या स्थितीत नाही.”

आणखी वाचा – सुप्रसिद्ध अभिनेत्री डॉली सोहीचे निधन, कर्करोगाशी झुंज ठरली अपयशी, काही तासांपूर्वीच बहिणीचाही झाला होता मृत्यू

डॉली सोही व अमनदीप सोही या दोन बहीणींच्या आकस्मिक निधनाचे वृत्त मन हेलावून टाकणारे आहे. अभिनेत्रीच्या कुटुंबासाठी हा काळ खूप कठीण आहे. अवघ्या काही तासांतच त्यांच्या दोन्ही मुलींचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे अभिनेत्रींच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तसेच दोन्ही अभिनेत्रीच्या निधनाने कुटुंबासह मनोरंजन विश्वालादेखील मोठा धक्का बसला आहे.

आणखी वाचा – आजचे राशीभविष्य : आजचा महाशिवरात्रीचा दिवस ‘या’ राशींच्या लोकांसाठी ठरणार फायदेशीर, आर्थिक भरभराटही होणार, जाणून घ्या…

अमनदीप सोही हीदेखील एक अभिनेत्री आहे. अमनदीप डॉलीइतकी लोकप्रिय नसली तरी, मनोरंजन उद्योगात अमनदीपचे स्वतःची वेगळी ओळख आहे. तिने अनेक टीव्ही मालिकांमध्ये अभिनय करत प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही बहिणींवर आज दुपारी नवी मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.


      

Tags: डॉली सोहीडॉली सोही बहिणीचा मृत्यूअमनदीप सोहीअमनदीप सोही यांचे कावीळमुळे निधनAmandeep SohiAmandeep Sohi passes away due to jaundiceAmandeep Sohi passes away Marathi NewsDolly SohiDolly Sohi sister died
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Kaakul Marathi Movie
Entertainment

‘काकुळ’च्या थरारक रहस्याचा उलगडा होणार नोव्हेंबरमध्ये, मोनालिसा बागलची प्रमुख भूमिका

सप्टेंबर 9, 2026 | 9:50 am
Dashami Movie Song
Entertainment

‘बुरी नजर वाले.. तेरा मुँह काला’ चा स्वॅग, ‘दशमी’ चित्रपटाचं हटके गाणं चर्चेत

सप्टेंबर 9, 2026 | 9:40 am
Daryabhavani Marathi Movie
Entertainment

‘दर्याभवानी’ साठी दिग्पाल लांजेकरांचे अनोखं गाऱ्हाणं, शूटिंगला सुरुवात, होणार ‘या’ दिवशी प्रदर्शित

सप्टेंबर 9, 2026 | 9:32 am
Bandhkhor Marathi Movie
Entertainment

सहा स्त्रियांच्या बंडाची कहाणी उलगडणार ‘बंडखोर’मधून, सुनेत्रा अजित पवार आणि सुनील गावस्कर यांच्या उपस्थितीत ट्रेलर प्रदर्शित

सप्टेंबर 8, 2026 | 1:48 pm
Next Post
adil khan durrani on marriage

“माझं पहिलंच लग्न”, राखी सावंतचा पूर्वाश्रमीचा पती आदिल खानने लग्नानंतर पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया, म्हणाला, “अल्लाहच्या आशीर्वादाने...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.