शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“सब में और मेरे में बहुत फरक है”, बहुचर्चित हिंदी वेबसीरिजमध्ये मराठमोळ्या कलाकारांची फौज, ट्रेलरमध्ये दिसली भरत जाधव यांची झलक

Kshitij Lokhandeby Kshitij Lokhande
ऑगस्ट 23, 2023 | 12:00 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Scam 2003 trailer out

"सब में और मेरे में बहुत फरक है", बहुचर्चित हिंदी वेबसीरिजमध्ये मराठमोळ्या कलाकारांची फौज, ट्रेलरमध्ये दिसली भरत जाधव यांची झलक

“रिस्क है तो इश्क है!” असं म्हणत २०२० मध्ये ओटीटी प्लॅटफॉर्मवर धुमाकूळ घातलेल्या ‘स्कॅम’ फ्रॅन्चाइसीमधील बहुप्रतिक्षित वेबसीरिज ‘स्कॅम 2003 – द तेलगी स्टोरी’चा ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला. २००३ साली उघडकीस आलेला देशातील सर्वात मोठा स्टॅम्प पेपर घोटाळा आणि त्यातील मुख्य सूत्रधार अब्दुल करीम तेलगी याच्या भोवती या वेबसीरिजचे कथानक फिरत आहे. ज्याचे दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक हंसल मेहता आणि तुषार हिरानंदानी यांनी केलं आहे. विशेष म्हणजे, या वेबसीरिजमध्ये अनेक मराठमोळे कलाकार झळकणार आहेत. (Scam 2003 The Telgi Story)

२०२० मध्ये आलेल्या ‘स्कॅम 1992 – द हर्षद मेहता स्टोरी’ या गाजलेल्या वेबसीरिज नंतर दिग्दर्शक हंसल मेहता ‘स्कॅम 2003 – द तेलगी स्टोरी’ ही वेबसीरिज घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. संजय सिंग यांच्या ‘तेलगी स्कॅम: रिपोर्टर्स डायरी’ या पुस्तकावरून ही वेबसीरिज प्रेरित असून दीड मिनिटांच्या या ट्रेलरची सुरुवात स्टॅम्प पेपर घोटाळ्याने होते. “सब में और मेरे में बहुत फरक है!” असं म्हणणाऱ्या तेलगीच्या या स्टोरीमध्ये पुढे काय घडणार आहे?, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

हे देखील वाचा – सिद्धार्थ चांदेकरच्या आईच्या दुसऱ्या लग्नाचं मराठी कलाकारांना कौतुक, फोटो पाहताच निवेदिता सराफ म्हणाल्या, “तुझ्यासारखा मुलगा…”

View this post on Instagram

A post shared by Sony LIV (@sonylivindia)

अभिनेता गगन देव रियार हा अब्दुल करीम तेलगीच्या भूमिकेत दिसणार आहे. प्रेक्षकांचा लाडका अभिनेता भारत जाधव यात महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर शशांक केतकर, राहुल दाभोलकर, समीर धर्माधिकारी असे अनेक मराठमोळे कलाकारही यामध्ये झळकणार आहेत. शिवाय, मुकेश तिवारी, सना अमीन शेख, शाद रंधावा हेदेखील यात दिसणार आहेत. १ सप्टेंबर पासून ही वेबसीरिज ‘Sony Liv’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

हे देखील वाचा – Video : “आम्हाला काय ऊत आलाय का?”, भर कार्यक्रमात जितेंद्र जोशी व अवधुत गुप्तेमध्ये जोरदार भांडण, व्हिडीओ व्हायरल

२०२० मध्ये ‘स्कॅम 1992 – द हर्षद मेहता स्टोरी’ नावाची वेबसीरिज आली होती, जी हर्षद मेहताच्या शेअर घोटाळ्यावर आधारित होती. यामध्ये मुख्य भूमिका साकारणारा प्रतीक गांधी प्रचंड लोकप्रिय ठरला आहे. आता ‘स्कॅम 1992’ नंतर ही वेबसीरिज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. (Scam 2003 Trailer out)

Tags: bharat jadhavnew web seriesottScam 2003 trailershashank ketkar
Kshitij Lokhande

Kshitij Lokhande

Latest Post

Dia Mirza Pregnancy
Women

…अन् गरोदरपणात दिया मिर्झाला झाला नको तो संसर्ग, लेकाच्या जीवावरही बेतलं, ३६ तासांनी शस्त्रक्रिया झाली आणि…

जून 7, 2025 | 10:00 am
Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Next Post
Prajakta Mali New Photoshoot

"गुडघा दुखतोय का?", प्राजक्ता माळीच्या नव्या फोटोशूटवर नेटकऱ्यांच्या मजेशीर कमेंट्स, अभिनेत्री म्हणते, "पोजेस देणं…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.