हमीदाबाईची कोठी नाटकाचा प्रयोग आणि थिएटरमधून नाना आणि मामांनी काढला पळ

Nana Patekar Ashok Saraf
Nana Patekar Ashok Saraf

सिनेसृष्टीतील दिग्गज कलावंत म्हणून आवर्जून एका कलाकाराचं नाव घेतलं जातं ते म्हणजे अभिनेते अशोक सराफ. अशोक सराफ यांनी चित्रपटसृष्टीचा काळ गाजवला. चित्रपट, मालिकांसोबत रंगभूमीवरही त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटविला. हमीदाबाईची कोठी हे व्यावसायिक रंगभूमीवरील एक गाजलेलं आणि महत्वाचं नाटक. या नाटकात अशोक मामांसोबत नाना पाटेकर हे देखील होते. या नाटकादरम्यानची एक आठवण मी बहुरूपी या पुस्तकात अशोक मामांनी शेअर केली आहे.(Nana Patekar Ashok Saraf)

हमीदाबाईची कोठी नाटकाचे बरेच प्रयोग झाले. दरम्यान एका गावात त्यांचा प्रयोग होता त्या गावात थिएटर म्हणाव अस काहीच नव्हत. एक सॉ मिल होती, तिथे प्रयोग करायचा होता. समोर खुर्च्या ठेवलेल्या. नाटक सुरू झाल आणि स्टेजवर खाली बसून नट मंडळी बोलू लागली आणि समोरच्या खुर्च्यावर बसलेल्या प्रेक्षकांना काही दिसेना. पहिल्या पाच मिनिटांमध्ये त्यांनी पडदा पाडला. याचा किस्सा सांगताना अशोक मामा म्हणाले, प्रयोग लावणाऱ्या लोकांचं म्हणणं पडलं की आम्ही सगळ नाटक उभ राहूनच कराव म्हणजे काही अडचण येणार नाही. विजयाबाईंच्या मते ते शक्यच नव्हतं. हे बोलण चालू असताना बाहेर गडबड वाढतेय हे आमच्या लक्षात आलं. लोक बोंबाबोंब करायला लागले होते.

पहा नानांनी कस काढलं अशोक मामांना संकटातून बाहेर (Nana Patekar Ashok Saraf)

मला माणसं ओळखत असल्यामुळे माझ्या नावानं शिमगा सुरू झाला. नानाच्या लक्षात आलं की प्रेक्षक चिडले तर मला टार्गेट करणार. त्यानं माझा हात पकडला आणि म्हणाला, ‘अशोक, चल माझ्याबरोबर.'(Nana Patekar Ashok Saraf)

थिएटरच्या मागच्या बाजूने नानांनी अशोक मामांना बाहेर काढलं. बाहेर असलेला सगळा चिखल तुडवत ते दोघही निघाले. काही अंतरावर तारेचं कुपण होतं. तेथून बाहेर पडले. दरम्यान थिएटरमध्ये घडलेल्या आक्रोशाच वर्णन करत मामा म्हणाले, आम्ही निघाल्यावर अक्षरशः मारामारीला सुरुवात झाली होती. लोकांनी खुर्च्याबिर्च्या तोडून टाकल्या होत्या. साडेसात फुटांचा माझा फ्लायर (पुट्ट्याचा पुतळा ) बनवलेला होता त्याच्याही चिंध्या केल्या गेल्या. आमच्या नाटकाच्या गाडीखाली आमचा ड्रायव्हर झोपला होता. त्याला बाहेर काढून मुस्कटात मारली. गाडीच्या काचाबिचा कोणी फोडल्या नाहीत हे नशीब.

photo credit : instagram

आम्ही दोघं रस्त्यावर पोचलो तर तिथे चिटपाखरूही नव्हतं. एक सायकलरिक्षा दिसली तशी नानानं ती थांबवली. रिक्षावाला वयस्क होता. आणि रस्ता चढणीचा. त्याला आम्हा दोघांचं वजन झेपेना. नानानं त्याला उतरवलं, मागे माझ्या बाजूला बसवलं आणि स्वतः रिक्षा ओढू लागला. आजही ती आठवण आली की माझ्या अंगावर शहारा येतो. नाना नसता तर त्या लोकांनी मला मारलंच असतं. नाटक न झाल्याचा सगळा राग माझ्यावर काढला असता. नानानं रिक्षा ओढत मला रेस्टहाऊसवर आणलं. एका खोलीत बंद करून ठेवलं. मग आपल्या अंगावरचे कपडे काढले. फक्त हाफपँटवर आणि डोक्याला रुमाल बांधून पुन्हा बाकीच्या लोकांच्या मदतीसाठी थिएटरच्या दिशेनं निघाला. काय काळीज आहे या माणसाचं! फणस आहे तो. बाहेरून जितका काटेरी तितकाच आतून मधाळ, गोड.(Nana Patekar Ashok Saraf)

हे देखील वाचा – आणि लक्ष्मीकांत निवेदिता सराफ यांना म्हणाले’बाई, एक लक्षात ठेव, तू चुकीचा सराफ शोधलास’

नाना निघून गेल्यानंतर मात्र अशोक मामांना चैन पडेना, शेवटी ते एकटे बाहेर पडले, आपल्या सहकाऱ्यांचं काय झालं असेल ही चिंता त्यांची पाठ सोडत नव्हती. चालत थोड्या अंतरावर जाताच एक रिक्षा समोरून येताना मामांना दिसली. नाटकातल्या सगळ्या बायका त्यात होत्या. ते पाहुन आल्या पावली मामा पुन्हा रेस्टहाऊसवर परतले. अशोक मामा पुढे म्हणाले, त्या रात्री आम्ही पहाटे तीन वाजता त्या गावातून निघालो. पुढे एक पोलीस व्हॅन, मध्ये आमची बस, मागे आणखी पोलीस, अशा शाही इतमामामध्ये निघालेली आमची पहिलीच नाटक कंपनीची बस असेल. या किस्स्यामुळे नाना आणि मामा यांच्यात असणाऱ्या जीवापाड आणि घट्ट मैत्रीच्या नात्याचं उदाहरण देणं वावगं ठरणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like
Ashok Saraf Birthday Special
Read More

त्या काळातही अशोक मामांनी सेट केला होता ‘हा’ फॅशन ट्रेंड शर्टची दोन बटणं नेहमी उघडीच का ठेवायचे अशोक मामा? मुलाखतीत सांगितलं कारण

अनेक कलाकार त्यांच्या काही विशिष्ठ अदाकारींसाठी, स्टाईल साठी ओळखले जातात. त्यांपैकी एक अभिनेता म्हणजेच महाराष्ट्राचे लाडके अभिनेते अशोक…
Sonalee Kulkarni Career Begining
Read More

मराठी बोलता येत नसताना सुद्धा आज मराठी सिनेसृष्टीमध्ये मानाने घेतलं जात नाव- काय आहे सोनालीच्या पहिल्या मालिकेचा किस्सा?

मराठी सिनेसृष्टी मध्ये अनेक कलाकारांनी त्यांच्या अभिनयाने स्वतःचा असा ठसा उमटवला आहे. अनेक अभिनेत्रींनी त्यांचा मोठा चाहता वर्ग…
Nivedita Ashok Saraf
Read More

आईचा वाढदिवस आणि त्याच दिवशी निवेदितांचं पहिल्यांदा घरी येणं! अशोक सराफ यांनी सांगितलं आई गेल्यानंतरचा हा भावुक किस्सा

अनेक कलाकार आणि त्यांच्या प्रेमकहाण्या पडद्यावर दिसतात तशाच खऱ्या आयुष्यात ही असतात असं फार कमी वेळा घडत. असाच…
Laxmikant Berde First Wife
Read More

पहिल्या बायकोचे अंत्यसंस्कार आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांचा भावुक निर्णय पाणावले होते सगळ्यांचे डोळे…

आवडत्या कलाकारांच्या लाडक्या जोड्या आणि त्यांच्या बद्दल जाणून घेण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. अभिनेत्री अशोक सराफ आणि निवेदिता…
Avadhoot Gupte Politics
Read More

मराठी चित्रपटांची ही गोष्ट अवधूतला जास्त खूपते…

झी मराठीवरील प्रसिद्ध कार्यक्रम म्हणजे खुपते तिथे गुप्ते तब्बल १० वर्षांनी हा कार्यक्रम पुन्हा एकदा पडद्यावर येत आहे.…