‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून घरा घरात पोहोचलेली अंकिता लोखंडे सध्या अधिक चर्चेत आहे. नुकताच तिचा पती विकी जैनबरोबरचा एक म्युजिक व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला आहे. ‘ला पिला दे’ असे या अल्बमचे नाव असून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. बिजनेसमॅन असलेल्या विकी जैनने पाहिल्यांदाच स्क्रीनसमोर दिसून आला आहे. दोघांच्याही जोडीला प्रेक्षकांनी खूप प्रेम दिलं आहे. याआधी दोघंही प्रसिद्ध शो ‘बिग बॉस’ च्या १७ व्या सीझनमध्ये एकत्र दिसून आले होते. यादरम्यान तिच्यावर कोणते प्रसंग आले आणि तिला कोणत्या प्रसंगांना सामोरे जावे लागले या बाबत अंकिताने खुलासा केला आहे. (ankita lokhande on depression)
अंकितने नुकतीच ‘इटाइम्स’ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने ‘बिग बॉस’नंतर डिप्रेशन व एंजायटी आली होती. याव्यतिरिक्त तिने तिच्या नवीन म्युजिक व्हिडीओबद्दलही भाष्य केले आहे. याबद्दल तिने सांगितले की, “तुमचा पार्टनर जेव्हा तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये पाठिंबा देतो तेव्हा ते तुमच्यासाठी खूप चांगले असते. माझ्याकडेही मला असा पाठिंबा देणारा पार्टनर असल्याने मी स्वतःला खूप भाग्यवान समजते. तो खूप हुशार आहे. त्यामुळे एकमेकांचे विचार देखील शेअर करत असतो”.
पुढे ती म्हणाली की, “अनेकदा जोड्या खूप वेगळ्या असतात. पण आम्ही पती-पत्नी आहोत तसेच आता सह-कलाकारदेखील आहोत त्यामुळे मला खूप छान वाटतं. आपला जोडीदार जर पुढे जात असेल आणि त्याला पाठिंबा दिला तर आपली अधिक प्रगती होते”.
तसेच तिने नैराश्यावर बोलताना सांगितले की, “ ‘बिग बॉस’ नंतर अनेक गोष्टींचा माझ्यावर परिणाम झाला. मला नैराश्य येण्यास सुरुवात झाली होती. त्याबद्दल मी विकीबरोबर देखील बोलले. हे सर्व होत असल्याने मी रात्रभर झोपू शकत नव्हते. खूप साऱ्या गोष्टींबद्दल मी विचार करत असे. मला सगळ्या गोष्टींबद्दल भीती वाटत असे. पण आता सर्व ठीक आहे. नैराश्यातून बाहेर येण्यासाठी मला माझ्या कुटुंबाने खूप मदत केली”.
तसेच यानंतर तिने सांगितले की, “आपण या सर्व गोष्टींना खूप हलक्यात घेतो. पण मी सगळ्यातून गेले आणि त्यासाठी विकी व कुटुंबाने खूप मदत केली. आधी मला ट्रोलिंगचा फरक पडत नव्हता. पण बिग बॉसनंतर मानसिकरित्या मी खूप खचून गेले. पण आता मी यातून बाहेर पडले असून त्याबद्दल मला आता काहीही विचार करायना नाही आहे”.
तिच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर ती ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटामध्ये महत्त्वपूर्ण भूमिकेमध्ये दिसली होती. यामध्ये तिने ‘यमुनाबाई’ यांची भूमिका केली होती. ही भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली होती.