मंगळवार, एप्रिल 21, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

नाटक सुरु असताना भार्गवी चिरमुलेकडून घडली मोठी चूक, किस्सा सांगत म्हणाली, “माझ्यामुळे ते नाटक…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
एप्रिल 5, 2024 | 1:40 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bhargavi chirmule Incident

नाटक सुरु असताना भार्गवी चिरमुलेकडून घडली मोठी चूक, किस्सा सांगत म्हणाली, "माझ्यामुळे ते नाटक…"

अभिनेत्री भार्गवी चिरमुलेने आजवर तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. नाटक, मालिका, चित्रपट या तीनही क्षेत्रात महत्त्वपूर्ण भूमिका साकारत सिनेसृष्टीत आपलं स्थान निर्माण केलं. सध्या भार्गवी ‘मर्डरवाले कुलकर्णी’ या नाटकाच्या प्रयोगांमध्ये व्यस्त आहे. नुकत्याच झालेल्या ‘झी नाट्य गौरव २०२४’ या सोहळ्याला हजेरी लावली होती. यावेळी अभिनेत्रीने नाटकादरम्यानचा एक किस्सा सांगितला. नाटकादरम्यान अभिनेत्रीची झालेली फजिती तिने या किस्स्यादरम्यान सांगितली. (Bhargavi chirmule Incident)

भार्गवी हा किस्सा सांगत म्हणाली, “नाटक म्हटल्यानंतर किस्से, आयत्या वेळी काहीतरी गडबड होणं हे साहजिक आहे. पण, ती गडबड प्रेक्षकांपर्यंत पोहोचू न देणं यात कलाकाराच्या अभिनयाचा कस लागतो, असं मला वाटत. नुकताच घडलेला किस्सा म्हणजे ‘मर्डरवाले कुलकर्णी’ नाटक सध्या चालू आहे. हे कॉमेडी नाटक आहे. त्यामुळे आम्हा सगळ्यांना सतत भयंकर अलर्ट राहावं लागतं. पंच लाइन्स, टायमिंग हे सगळं विनोदी नाटकाचा एक भाग असतो. त्याच्यामुळे अनेक गोष्टींची व्यवधानं सांभाळत आम्हाला हे नाटक करावं लागतं”.

आणखी वाचा – अनिरुद्ध-अरुंधती येणार का पुन्हा एकत्र?, संजना बोलता बोलता भलतंच बोलून गेली अन्…; मालिकेत पुढे काय घडणार?, प्रोमो पाहून वाढली उत्सुकता

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

पुढे ती म्हणाली, “परवाच्या प्रयोगात असं झालं की अचानक एक क्षण आला. आणि हा क्षण प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यात एकदा तरी नक्कीच येतो, की आपण त्या क्षणाला ‘ब्लॅंक’ होऊन जातो, आपल्याला पुढचं काहीच आठवत नाही. पुढे काय घडणार आहे, आपण कुठे आहोत, काय आहोत हे काहीच आठवत नाही. आपल्या डोळ्यांपुढे पूर्णपणे अंधारी येते. त्याला आम्ही कॉमेडी भाषेत ‘ब्लॅंक ऑफ इंडिया’ म्हणतो. अशी मी स्टेजवर पूर्णपणे ब्लॅंक झाले आणि तसं झाल्यानंतर कुठल्याही कलाकाराच्या डोळ्यांत ते दिसतं. समोरचा कलाकार जर तुमचा मित्र असेल, तर त्याला लगेच कळतं. वैभवलासुद्धा हे कळलं की, मला काहीच आठवत नाही. वैभवनं, माझ्याकडे बघून काय? असं विचारलं. तेव्हा मी खूप मनापासून ते वाक्य शोधत होते”.

आणखी वाचा – तरुणाईला लाजवेल असा नारकर कपलचा डान्स व्हिडीओ व्हायरल, ट्रोल नव्हे तर नेटकऱ्यांनी केलं भरभरुन कौतुक, दोघांची एनर्जी पाहून म्हणाले…

हा किस्सा पुढे सांगत ती म्हणाली की, “जसं मी म्हटलं की, कॉमेडी नाटक असल्यामुळे एकावर एक अशी वाक्यं असतात. माझं ते वाक्यं तो घेऊ शकत नव्हता आणि ते वाक्य घेतल्याशिवाय नाटक पुढे जाणार नव्हतं. नाटकात निमिष कुलकर्णी आहे आणि त्याची पाठ असल्यानं त्याला ते कळत नव्हतं की मी विसरलीय. तो वाट बघतोय वाक्य का येत नाही आहे, मी विचार करतेय वाक्य काय आहे आणि एका पॉईंटला वैभवनं माझ्याकडे असे डोळे मोठे करुन वाक्य, असं म्हटलं आणि मग त्या क्षणाला मनात वीज चमकली आणि मला ते वाक्य आठवलं. फायनली मी ते वाक्य बोलली आणि म्हणून नाटक पुढे गेलं. नाही तर बराच वेळ नाटक तिथेच अडकून राहिलं असतं. पण, त्या दिवशी मी खरंच मनापासून रंगदेवतेची माफी मागितली की, माझ्या हातून काय चुकलं असेल, तर मला माफ कर. पण, पुन्हा कधी माझ्याच काय कुठल्याच कलाकाराच्या आयुष्यात असं होऊ नये. तेव्हा आपला सहकलाकार आपल्याला जे सांभाळून घेतो आणि आपण काहीच घडलं नाही, असं आपण दाखवतो. या दोन गोष्टी अभिनयाचा कस दाखविण्यासाठी एका कलाकारासाठी खूप आहेत”.

Tags: bhargavi chirmuleBhargavi chirmule Incidententertainmentmarathi actress
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

dipika kakar two new cysts
Entertainment

कॅन्सर सर्जरीनंतर दीपिका कक्करची तब्येत पुन्हा बिघडली, दुसऱ्यांदा झाला हा आजार, लेकाची वाटतेय काळजी

एप्रिल 20, 2026 | 3:46 pm
Atlee Baby Girl
Entertainment

सुप्रसिद्ध दिग्दर्शक दुसऱ्यांदा झाला बाबा, घरी आली चिमुकली परी, स्पेशल पोस्टद्वारे दिली गुडन्यूज

एप्रिल 20, 2026 | 12:34 pm
 Deepika Padukone pregnant
Entertainment

४० व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार दीपिका पदुकोण, प्रेगन्सी किटद्वारे दिली गुडन्यूज, लेक दुवाचीही दिसली झलक

एप्रिल 20, 2026 | 11:48 am
Deepali Sayed First Post After Bigg Boss Marathi 6
Entertainment

पाच लाखांची बॅग सोडली आणि…; एलिमिनेट झाल्यानंतर दिपाली सय्यदची पहिली पोस्ट, म्हणाली, “माझ्यासाठी…”

एप्रिल 20, 2026 | 11:29 am
Next Post
actor avinash narkar on play

"नाडी सुटली, पायजमा खाली आला अन्…", अविनाश नारकरांनी 'त्या' कलाकाराची केली पोलखोल, म्हणाले, "नाटक सुरु असतानाच…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.