शुक्रवार, एप्रिल 17, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“अशोक सराफ यांच्यामुळे शिस्त लागली”, श्वेता शिंदेने शेअर केली ‘ती’ आठवण, म्हणाली, “वेळेचं महत्त्व…”

Saurabh Moreby Saurabh More
एप्रिल 5, 2024 | 12:29 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Shweta Shinde said that she became disciplined in life because of Ashok Saraf

“अशोक सराफ यांच्यामुळे शिस्त लागली”, श्वेता शिंदेने शेअर केली ‘ती’ आठवण, म्हणाली, “वेळेचं महत्त्व...”

मराठी मालिकांमधील लोकप्रिय चेहरा म्हणून अभिनेत्री श्वेता शिंदेने आजवर अनेक भूमिका साकारत मराठी सिनेसृष्टीत तिचं स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. मराठी मालिका विश्वातील ‘काटा रुते कुणाला’, ‘वादळवाट’, ‘अवघाचि हा संसार’ या मालिकांद्वारे श्वेताने प्रेक्षकांची मनं जिंकली. त्यानंतर अभिनेत्रीने आपला मोरचगा निर्मिती क्षेत्राकडे वळवला. ‘देवमाणूस’, ‘मिसेस मुख्यमंत्री’ व ‘लागीर झालं जी’ यांसारख्या लोकप्रिय मालिकांची निर्मिती करत तिने निर्मातीक्षेत्रातही आपला ठसा उमटवला आहे.

shestमराठी नाटक, मालिका व चित्रपट अश्या तिन्ही क्षेत्रात अभिनय करत तिने प्रेक्षकांचे मनोरंजन केले. याशिवाय यशस्वी निर्माती म्हणूनही तिचं प्रवास चालूच आहे. मनोरंजन क्षेत्रात कुणाच्याही पाठिंब्याशिवाय तिने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. यादरम्यान अशोक सराफ यांच्यामुळे आपल्या आयुष्यात एक शिस्त आली असल्याचे तिने म्हटले. श्वेताने नुकतीच ‘झी नाट्य गौरव २०२४’ सोहळ्याला हजेरी लावली. यावेळी तिने नाटकामुळे आयुष्यात शिस्त आल्याचे म्हटले.

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

आणखी वाचा – “त्याने दोन गोष्टी नाही केल्या तरी…”, सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचं रोखठोक मत, म्हणाली, “हा फरक…”

झी मराठीच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओमध्ये श्वेता असं म्हणते की, “माझं पहिलं ‘मनोमिलन’ नावाचं नाटक होतं. तेव्हा नाटकाचे दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी होते. ते ब्लॅकआउट म्हणाले की आम्ही बाहेर चालत जायचो. तर या नाटकाची तालीम स्टेजवर चालायची. तेव्हा ब्लॅकआउटनंतर लाइट्स लागल्या तेव्हा मी बॅकस्टेजला गेलेच नव्हते, मी स्टेजवरच होते. तेव्हा मला कळलं की, ब्लॅकआउटला विंगेत जायचं असतं. तेव्हा चंदू सर म्हणाले अगं एक्झिट घे. तेव्हा मी त्यांना अंधारात चालणार नसल्याचे सांगितले. तेव्हा त्यांनी मला विंगेत लाइट कसा बघायचा, चालू प्रयोगात एक्झिट कशी घ्यायची हे सगळं शिकवलं.”

आणखी वाचा – आजचे राशी भविष्य : आज शुभ योगामुळे ‘या’ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अगदी खास, मेष ते मीन राशीपैकी कुणावर असणार लक्ष्मीची देवीची कृपा?

यापुढे श्वेताने अशोक सराफ यांच्यामुळे तिच्या आयुष्यात शिस्त कशी आली. याबद्दल तिने सांगितले. तिने असं म्हटलं की, “अशोक मामांचं नाव मी आवर्जून घेईन. कारण त्यांच्यामुळे आयुष्यात शिस्त आली आणि वेळेचं महत्त्व कळायला लागलं. त्यांच्यातील एका दैवी शक्तीने त्यांनी सर्वांनाच अभिनयातले काही बारकावे सांगितले आहेत. तसंच त्यांनी मलाही खूप काही शिकवलं. पण त्याचबरोबर बॅकस्टेजच्या काही गोष्टीदेखील त्यांनी आम्हाला शिकवल्या आणि ते मी कधीच विसरणार नाही”.   

Tags: ashok sarafmarathi entertainment newsshweta shinde
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Next Post
aayesha khan on casting couch

“नेटचा टॉप घालून...”, ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्रीचा कास्टिंग काऊचबाबत धक्कादायक खुलासा, म्हणाली, “ती व्यक्ती जवळ आली अन्...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.