Radha Patil Talk On Bar Dancer Topic : ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘बिग बॉस’ मराठी सिझन सहा सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. या सिझनमधील सर्वच स्पर्धक चर्चेचा विषय ठरत आहेत. कधी राकेश बापट आणि अनुश्री माने यांच्यातील वाद, तर कधी सागर कारंडे आणि तन्वी कोलते यांच्यातील भांडण, तर कधी ओमकार राऊत आणि विशाल कोटियन यांच्यातील मारामारीमुळे ‘बिग बॉस’ मराठीचा हा सिझन चांगलाच गाजताना दिसत आहे.
‘बिग बॉस’ मराठी सिझन सहाचा दुसरा ‘भाऊचा धक्का’ नुकताच पार पडला. यामध्ये रितेश देशमुख यांनी विशेषतः अनुश्री मानेची शाळा घेतली, तर याचवेळी विशाल कोटियनला समजावतानाही ते दिसले. ‘बिग बॉस’च्या पहिल्या आठवड्यात कोणताही स्पर्धक एलिमिनेट झाला नव्हता. मात्र, दुसऱ्या ‘भाऊच्या धक्क्यावर’ नृत्यांगणा राधा पाटील एलिमिनेट झाली. एलिमिनेशननंतर राधा पाटीलने ‘इट्समज्जा मराठी’ या यूट्यूब वाहिनीला नुकतीच मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिला ‘बार डान्सर’च्या मुद्द्यावर प्रश्न विचारण्यात आला. ‘बार डान्सर’चा मुद्दा दाबला गेला असून त्यावर कोणीही जास्त काही बोललं नाही, याबाबत तिचं मत काय आहे, असा प्रश्न तिला विचारण्यात आला. यावर राधा पाटील म्हणाली, (Radha Patil Talk On Bar Dancer Topic)
“मी स्वतः ‘बार डान्सर’चा मुद्दा ऐकलेला नव्हता, पण मी लावणीबद्दल ऐकलं होतं. आणि याविषयी बाहेर तन्वीसोबत बसून मी बोलत होती. मी तन्वीला म्हटलं की, ‘जर पुन्हा दिपाली सय्यद माझ्या लावणीबद्दल बोलली, तर मी नाही ऐकणार. आणि मग मी काहीपण बोलू शकते. जे आम्हाला माहिती आहे, आणि महत्त्वाचं म्हणजे ते लोकांना माहिती नसेल, अशा काही गोष्टी आहेत.’मग आमच्या क्षेत्रामध्ये ज्या मुली आहेत, ज्या तिथे पण काम करून आल्या आहेत, त्यामुळे आम्हाला खूप काही गोष्टी माहिती आहेत. मग मी पण ते काढू शकते. जर दिपाली लोकांना अशा पद्धतीने बोलते, तर तू आधी डोळ्यांनी बघ. मुली कशा डान्स करतात? काय करतात? बाकीच्या मुलींना बघून तू आम्हाला जज करणार असशील, तर तुला ही आम्ही काहीपण जज करू शकतो. म्हणून तिचं माझ्याशी थोडंसं पटत नव्हतं. आणि महत्त्वाचं म्हणजे मी दिपाली सय्यदला आईसारखा दर्जा दिला होता.” असं म्हणत तिने भावना व्यक्त केल्या आहेत. (Radha Patil Talk On Bar Dancer Topic)




