बुधवार, ऑगस्ट 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“रंग कुणाच्या बापाचा नाही”, सहर शेखच्या ‘मुंब्रा हिरवा करु’ या विधानावर सयाजी शिंदेंचं उत्तर, म्हणाले, “राजकारण…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जानेवारी 27, 2026 | 1:07 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Sayaji Shinde on Sahar Sheikh

"रंग कुणाच्या बापाचा नाही", सहर शेखच्या 'मुंब्रा हिरवा करु' या विधानावर सयाजी शिंदेंचं उत्तर, म्हणाले, "राजकारण…"

Sayaji Shinde on Sahar Sheikh : ठाणे महापालिका निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर सहर शेखने म्हणालेल्या, “हा तर फक्त ट्रेलर आहे. पुढच्या निवडणुकीत मुंब्रा शहर संपूर्ण हिरवं करुन टाकू. मुंब्रातून विरोधकांना पळवून लावू आणि इथला प्रत्येक उमेदवार एमआयएमचाच असेल”, या वक्तव्याने एकच खळबळ उडाली. त्यांच्या ‘मुंब्रा हिरवा करू’ या विधानावर राजकीय वर्तुळातून टीका करण्यात आली. तसंच मराठी मनोरंजन विश्वातूनही यावर प्रतिक्रिया व्यक्त केल्या गेल्या. अभिनेता अभिजीत केळकरनेदेखील एका व्हिडीओद्वारे टोला लगावलेला पाहायला मिळाला. यापाठोपाठ आता आणखी एका अभिनेत्याने या प्रकरणावर वक्तव्य केलं आहे.

मनोरंजन विश्वात काम करण्याबरोबरच सयाजी शिंदे हे वृक्षसंवर्धनाचं कामदेखील करतात. देवराईच्या निमित्ताने ते वृक्षसंवर्धनाचं काम करताना दिसतात. अशातच जुन्नर तालुक्यात सयाजी शिंदे देवराईच्या कामानिमित्त पोहोचले होते. यावेळी TV9 शी साधलेल्या संवादात त्यांनी देवराईबद्दल त्यांचं मत मांडलं. ते म्हणाले, “महाराष्ट्रातील पहिली देवराई ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने जुन्नर तालुक्यातून सुरु करत आहे. संतांचे जे दुर्लक्षित विचार राहिले, ते आम्ही पुढे घेऊन जात आहोत. इथे सध्या एक हजार झाडं लावली असून आणखी १० हजार झाडं लावायची आहेत”.

आणखी वाचा – देबिना बॅनर्जीच्या लेकींनी गायलं राष्ट्रगीत, मागे उभ्या असलेल्या महिलांना बोलताना पाहून नेटकरी भडकले, म्हणाले, “लाज वाटते…”

यानंतर त्यांनी सद्यस्थितीच्या राजकरणाविषयीही भाष्य केलं ते म्हणाले, “मला राजकारणातलं काही कळत नाही आणि त्यात रसही नाही. हजारो वर्षांपासून राजकारण चालू आहे आणि ते आजही चालत आलंय. आज काय नवीन नाही. कुठलाही रंग कुणाच्या बापाचा नाही. सगळे रंग हे निसर्गाच्या बापाचे आहेत. निसर्ग आपलं मुळ आहे आणि त्यात सगळेच रंग आहेत. ते कुणालाच तयार करता येत नाहीत. ते निसर्गातूनच येतात. ते फक्त झाडातूनच येतात”.

Tags: politicsSahar Sheikhsayaji shinde
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Munna Bhai Fame actor's Car Hits Two People
Entertainment

‘लगे राहो मुन्ना भाई’ फेम अभिनेत्याच्या कारची स्कूटरला धडक; दोन जण गंभीर जखमी

ऑगस्ट 18, 2026 | 2:05 pm
Govinda On Affair Rumours
Entertainment

“खरं प्रेम अस्तित्वात आहे का?”; कश्मीरा शाहच्या पोस्टने वेधलं चाहत्यांचं लक्ष, म्हणाली, “लग्न, प्रेम…”

ऑगस्ट 17, 2026 | 5:59 pm
Manjar Movie Poster Onkar Bhojane in lead role
Entertainment

तीन मित्र अन् मोठा गोंधळ; ‘मांजर’ चित्रपटाच्या पोस्टरने वाढवली उत्सुकता, १८ सप्टेंबरला उलगडणार…

ऑगस्ट 13, 2026 | 5:18 pm
Swara Bhasker breaks silence on being trolled
Entertainment

“मुस्लिमाशी लग्न करून तुम्ही लठ्ठ आणि कुरुप झालात का?”, ट्रोलिंगवर भडकली अभिनेत्री, म्हणाली, “सेक्सी मुली…”

ऑगस्ट 12, 2026 | 10:19 am
Next Post
Radha Patil Talk On Bar Dance Topic

"दिपालीला आईसारखा दर्जा..." ‘बिग बॉस'मधून बाहेर पडताच ‘बार डान्सर’ मुद्द्यावर राधा पाटील स्पष्टच बोलली; म्हणाली, "इतर मुलींना बघून…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.