गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री रेश्मा शिंदेच्या लग्नाची चर्चा सुरू होती. अखेर तिचा विवाहसोहळा नुकताच पार पडला. ‘आयुष्याची नवीन सुरुवात…’ असं म्हणत रेश्मानं लग्नाचे फोटो शेअर केले. या फोटोंवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. २९ नोव्हेंबर, शुक्रवार रोजी रेश्मा शिंदे विवाहबंधनात अडकली. कुटुंबिय आणि जवळच्या मित्र मैत्रिणींच्या उपस्थितीत तिचा लग्नसोहळा पार पडला. श्रीरंग देशमुख, मृणाल देशपांडे, अभिजीत खांडकेकर, पौर्णिमा तळवलकर, हर्षदा खानविलकर, विदिषा म्हसकर, शाल्मली, अनघा अतुल, आशुतोष गोखले आदी कलाकार रेश्माच्या लग्नाला हजर होते. (reshma shinde haldi)
तसंच ‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेतील काही कलाकारांनीदेखील रेश्माच्या लग्नाला खास उपस्थिती लावली होती. त्यांच्या लग्नाचे काही खास फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. अशातच तिच्या हळदी समारंभ सोहळ्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. अभिनेत्रीने हा व्हिडीओ तिच्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर केला आहे. अभिनेत्रीने हळदीसाठी खास दाक्षिणात्य पद्धतीचा लूक केला होता.
हळदी रंगाचा लेहेंगा, त्यावर हिरवा पदर, पिवळा ब्लाऊज, फुलांचे दागिने आणि मोकळे केस असा खास लूक अभिनेत्रीने हळदी सोहळ्यासाठी केला होता. या हळदी स्पेशल लूकमध्ये अभिनेत्री रेश्मा शिंदे खूपच सुंदर दिसत होती. तर, तिच्या होणाऱ्या नवऱ्यानेही तिच्या हळदी लूकला साजेसा असा पिवळ्या रंगाचा कुर्ता घातला होता. दोघेही या लूकमध्ये अतिशय सुंदर दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये दोघेही अतिशय आनंदी असल्याचे पाहायला मिळत आहे.
आणखी वाचा – दीड तासाच्या डॉक्युमेंट्रीमध्ये हनी सिंहने प्रेक्षकांना काढलं वेड्यात, शाहरुख खानच्याच नावावर सगळा गेम अन्…
दरम्यान, रंग माझा वेगळा मालिकेमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री रेश्मा शिंदे घराघरांत पोहोचली. सध्या ती स्टार प्रवाह वरीलच घरोघरी मातीच्या चुली या मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतून ती जानकी या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. तिची भूमिका प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे