‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेतील शिस्तप्रिय एजे जितका प्रेक्षकांना आवडतो तितकीच वेंधळी लीलादेखील प्रेक्षकांना आवडते. अनेकदा वेंधळापणा करणारी लीला प्रसंसंगी लीला धाडसाने संकटांना सामोरी जाते. ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेने अल्पवधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. मनाविरुद्ध झालेल्या एजे व लीला यांच्या लग्नामुळे त्यांच्यातील प्रेमकहाणी आता हळूहळू बहरत असल्याचे पाहायला मिळत आहे आणि याचा एक नवीन प्रोमो नुकताच शेअर करण्यात आला आहे. (Navri Mile Hitlerla serial update)
या नवीन प्रोमोमध्ये एजे व लीला रोमॅंटिक डान्स करत असल्याचे पाहायला मिळत आहे. आजूबाजूला खास फुग्यांचे डेकोरेशन करण्यात आले असून यामध्ये लीला व एजेंची जवळीकही पाहायला मिळत आहे. या रोमॅंटिक प्रोमोला शाहरुख खानच्या ‘झीरो’ चित्रपटातील ‘मेरे नाम तू’ हे खास गाणं लावण्यात आलं आहे. यात एजे लीलाला अंगठी देत प्रपोज करत “मेरे दिल के जुबान पर एक ही बात है” असं म्हणत प्रपोज करतात.
आणखी वाचा – महाराष्ट्रीयन पद्धतीला साऊथ इंडियन टच, शाही थाटात झाली रेश्मा शिंदेची हळद, Unseen Video समोर
‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत दाखविल्याप्रमाणे लीला व एजे यांच्यात चांगली मैत्री आहे. लीला एजेच्या प्रेमात पडली आहे. तिने तिचे प्रेम व्यक्त केले आहे. मात्र, तिला स्पष्टपणे एजेने सांगितले की, त्याचे त्याच्या पहिल्या पत्नीवर अंतरावर प्रेम आहे. तो तिला विसरू शकत नाही. ‘नवरी मिळे हिटलरला’चा हा रोमॅंटिक नवीन प्रोमो प्रेक्षकांनाही भलताच आवडला आहे. अनेकांनी या प्रोमोला लाईक्स व कमेंट्स करत प्रतिसाद दिला आहे.
आणखी वाचा – दीड तासाच्या डॉक्युमेंट्रीमध्ये हनी सिंहने प्रेक्षकांना काढलं वेड्यात, शाहरुख खानच्याच नावावर सगळा गेम अन्…
दरम्यान, अनेकांनी या प्रोमोखाली ‘खूप छान’, ‘आतुरता’, ‘आता वाट बघणे अशक्य आहे’, ‘आणखी वाट पाहू शकत नाही’ अशा अनेक कमेंट्स करत या नवीन ट्विस्टबद्दल उत्सुकता व्यक्त केली आहे. त्यामुळे आता अखेर लीलाच्या मनासारखे होणार आहे. तर मालिकेत लीला एजेंचे प्रेम स्वीकारणार का? या दोघांच्या प्रेमात काही अडथळा येणार का? किंवा हे स्वप्न तर नसणार ना? हे आगामी भागात पाहायला मिळणार आहे