स्टार प्रवाह लवकरच ‘घरोघरी मातीच्या चुली’ ही नवीकोरी मालिका घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेत ‘रंग माझा वेगळा’ फेम अभिनेत्री रेश्मा शिंदे महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. रेश्मासह या मालिकेत बाळूमामांच्या भूमिकेमुळे घरोघरी पोहचलेला अभिनेता सुमित पुसावळे हा मुख्य नायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेत जानकी-हृषीकेश यांच्या आयुष्यात कुटुंबाचं असणारं महत्व अधोरेखित करण्यात आलं आहे. (Adesh Bandekar served food to the guests)
या नवीन मालिकेची पत्रकार परिषद नुकतीच पुणे येथील प्रसिद्ध ढेपे वाडा येथे आयोजित करण्यात आली होती. या वेळी ढोल ताशाच्या गजरात मालिकेतील कलाकारांचं जंगी स्वागत करण्यात आलं. पत्रकार परिषदेनंतर खास पारंपरिक पद्धतीत जेवणाची पंगत देखील आयोजित करण्यात आली होती. या पंगतीचं खास वैशिष्ठय म्हणजे मालिकेच्या कलाकारांसह निर्माते आदेश बांदेकर यांनी देखील पाहुण्यांना जेवण वाढत त्यांचं आदरातिथ्य केलं. आदेश बांदेकर यांचा हा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतं आहे.
मालिकेतील जानकीने “ढेपेंच्या वाड्यात आज बेत आहे खास, हृषीकेशरावांना भरवते प्रेमाचा घास” असा सुंदर उखाणा घेत हृषीकेशला प्रेमाचा घास भरवला. रेश्मा-सुमितसह मालिकेतील अन्य कलाकार देखील या वेळी ढेपेवाड्यात उपस्थित होते. ‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेची निर्मिती सोहम प्रोडक्शन अंतर्गत करण्यात येत असल्याने याप्रसंगी संपूर्ण बांदेकर कुटुंब देखील उपस्थित होतं. या वेळी बांदेकर कुटुंबाचं देखील जल्लोषात स्वागत करण्यात आलं. (Adesh Bandekar served food to the guests)
ढेपे वाड्यात या वेळी ढोल ताशाच्या गजरात मालिकेतील कलाकारांचं, पत्रकरांचं तसेच निर्मात्यांच जंगी स्वागत करण्यात आलं. पत्रकार परिषदेनंतर खास पारंपरिक पद्धतीत जेवणाची पंगत देखील आयोजित करण्यात आली होती. या पंगतीत जानकीने खास उखाणा घेत हृषीकेशला प्रेमाचा घास देखील भरवला. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. स्टार प्रवाह नेहमी प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी कार्यरत नवनवीन विषय प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्याचं काम करतं. ‘आई कुठे काय करते’, ठरलं तर मग’, ‘प्रेमाची गोष्ट’ यांसारख्या मालिका निर्मित करुन स्टार प्रवाहने प्रेक्षकांना आपलंसं केलं आहे.