गुरूवार, मे 22, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

आईकडून छळ, १५व्या वर्षी विवाहित व्यक्तीच्या प्रेमात, फसवणूक अन्…; आता अशा परिस्थितीमध्ये आहे सुप्रसिद्ध अभिनेत्री, ओळखणंही कठीण

Majja Webdeskby Majja Webdesk
मार्च 13, 2024 | 4:18 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
actress seema kapoor

आईकडून छळ, १५व्या वर्षी विवाहित व्यक्तीच्या प्रेमात, फसवणूक अन्...; आता अशा परिस्थितीमध्ये आहे सुप्रसिद्ध अभिनेत्री, ओळखणंही कठीण

लहान पडद्यावरील अनेक अभिनेत्री या यशस्वी झाल्या आहेत तर काहींना अपयशही आले आणि त्या मालिकाविश्वापासून गायब झाल्या आहेत. पण एक अशी अभिनेत्री आहे जिने अगदी लहानपणापासूनच अभिनयक्षेत्रात पदार्पण केले आणि सुरुवातीपासूनच तिला मालिकांमध्ये मुख्य भूमिका मिळाल्या. ही अभिनेत्री म्हणजे सीमा कपूर. सीमा या सर्वात बोल्ड व यशस्वी अभिनेत्रींपैकी एक आहेत. त्यांनी मालिकांमध्ये मुख्य भूमिका केल्या आहेत. तसेच त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. लहान पडद्यावरील पहिली ‘नागिन’म्हणूनही त्यांना ओळखले जाते. (actress seema kapoor )

सीमा यांनी आपल्या अभिनयाची सुरुवात सहाव्या वर्षी केली. ती सर्वात आधी तिच्या वडिलांच्या चित्रपटामध्ये दिसून आली होती. नंतर ती रमेश सिप्पी यांच्या मालिकेतून मुख्य भूमिकेमध्ये दिसली. त्यानंतर ती अनेक हिट मालिकांमध्ये दिसली. तिचे व्यावसायिक आयुष्य खूप चांगले सुरू होते मात्र त्यांच्या खासगी आयुष्यात मात्र अनेक चढ उतार आलेले दिसून आले. नुकतीच सीमा यांनी एका मुलाखतीमध्ये आपल्या खासगी आयुष्यातील अनेक खुलासे केले आहेत.

आणखी वाचा – Video : आदेश बांदेकर यांच्या ‘या’ कृतीचं होतंय कौतुक, पाहुण्यांना स्वतःच जेवण वाढलं अन्…; जपली मराठी संस्कृती

View this post on Instagram

A post shared by Seema Kapoor (@iamseemakapoor)

या मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितले की, “मी जेव्हा लहान होते तेव्हा माझ्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला. त्यानंतर मी माझ्या आईबरोबर राहत होते. पण त्यावेळी आईनेच  बालशोषण केले. माझी आई खूप कठोर होती. ती एका प्रसिद्ध व्यवसायिकाची मुलगी असल्याने तिच्यामध्ये अहंकार होता. तसेच ती माझ्या वडिलांबरोबरही खुश नव्हती त्यामुळे त्यांचे कधीही पटले नाही”. पुढे त्या म्हणाल्या की, “आमच्या घरी खूप भांडणं व्हायची. त्यामुळे आई-वडील विभक्त झाले. पण ती आमची आई कधीच झाली नाही. ती माझ्या भावंडांनाही मारहाण करत असे. आमच्या तोंडातून अनेकदा रक्तही येत असे. मी यावर जास्त काही बोलणार नाही. पण माझे बालपण खूप कठीण होते”.

आणखी वाचा – “सासूबाईंचं नाव घेताच घाम फुटतो कारण…”, प्रसाद जवादेला सासरच्या मंडळींकडून कशी मिळते वागणूक?, म्हणाला, “वेळ-काळ समजून…”

तसेच त्यांनी वैवाहिक आयुष्याबद्दलही काही खुलासे केले. त्या म्हणाल्या की, “१५ व्या वर्षी मी ३५ वर्षांच्या व्यावसायिकाला डेट करत होते. ते विवाहित होते पण मला त्याची कल्पना नव्हती. पण मला जेव्हा कळलं की ते विवाहित आहेत आणि माझी फसवणूक झाली आहे तेव्हा माझ्या मनात आत्महत्या करण्याचा विचारही केला.  त्यांना एक मुलगी आहे हे देखील मला माहीत होते. जेव्हा मी तिला आईबद्दल विचारले तेव्हा ती चेहराही लक्षात नसल्याचे सांगत असे”.    

त्यानंतर सांगताना त्या म्हणाल्या की, “मी गोळ्या खाल्ल्या होत्या आणि माझी ज्युली नावाची एक कुत्री होती. तिला मी तिला  कवटाळलं  आणि नंतर वडिलांना बाय बोलण्यासाठी गेले. त्यांनी मला परत पाठवलं पण नंतर काही गडबड असल्याचे त्यांच्या लक्षात आलं आणि ते माझ्या खोलीमध्ये आले. मला लगेच रुग्णालयात घेऊन गेले आणि माझे प्राण वाचले”.

सीमा यांनी त्यांच्या आयुष्यातील सर्व प्रसंग सांगताना खूप भावनिक झाल्या होत्या.  २०१५ साली त्या ‘रझिया सुलतान’ या मालिकेमध्ये ‘शमशाद बेगम’च्या भूमिकेमध्ये दिसल्या होत्या.

Tags: hindi televisionhindi tv serialSeema Kapoortelevision actresstv serial
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Raja Shivaji Release Date Announced
Entertainment

मोठी घोषणा! रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ चित्रपटाची तारीख समोर, सहा भाषांत होणार प्रदर्शित

मे 21, 2025 | 6:27 pm
Vaishnavi Hagwane Death
Social

पैशांसाठी मारहाण, नणंद तोंडावर थुंकली अन्…; पुण्यातील घरंदाज कुटुंबातील सूनेची आत्महत्या, आई-वडिलांनी सांगितलं नेमकं काय घडलं?

मे 21, 2025 | 5:54 pm
Sunil Shetty on Pahalgam attack
Entertainment

पहलगाम हल्ल्यावर बॉलिवूड शांत का?, सुनील शेट्टी स्पष्टच बोलले, म्हणाले, “बोललं की शिवीगाळ होते आणि…”

मे 21, 2025 | 4:09 pm
Viral Video
Entertainment

Viral Video : भर रस्त्यात नवऱ्याकडून पत्नीला मारहाण, बाळालाही फेकलं अन्…; पालक म्हणून हरले…

मे 21, 2025 | 2:50 pm
Next Post
Smriti irani talked about her struggle life and recalls she was working at mcdonald see the details

पैशांसाठी McDonald मध्ये झाडू मारायचं काम करायच्या स्मृती ईराणी, एकता कपूरनेही कामासाठी नाकारलं अन्…; कसं बदललं आयुष्य?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.