जिच्या हावभावांवर प्रत्येक वेळी प्रेक्षक घायाळ होतात, ती म्हणजे अभिनेत्री जेनेलिया देशमुख. तिच्या अभिनयाने तिने कायमच प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे. हिंदी तसेच साऊथच्या चित्रपटानं मध्ये जिनेलियाने तिच्या कामाची छाप पाडलीच आहे, परंतु वेड या मराठी चित्रपटातून तिने मराठी चित्रपट सृष्टीतही पदार्पण केले आहे. (Genelia Deshmukh)
या चित्रपटातील तिच्या श्रावणी या भूमिकेला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं. गेले २० वर्ष जिनेलिया सिनेसृष्टी मध्ये कामे करत आहे तुझे मेरी कसम या चित्रपटापासून जिनेलियाचा प्रवास सुरु आहे. त्या नंतर जिनेलियाने अनेक हिट चित्रपट केले. तिच्या हावभावाने ती प्रेक्षकांच्या मनावर राज्य करते आहे. अभिनेता रितेश देशमुख याच्या सोबत लग्न झाल्या नंतर काही वर्ष जिनेलियाने कामापासून ब्रेक घेतला होता. तब्ब्ल दहा वर्षांनी वेड या मराठी चित्रपटातून जिनेलियाने पुन्हा चित्रपट सृष्टीत पदार्पण केले आहे. आणि या हि चित्रपटात ती प्रेक्षकांच्या अपेक्षकांना खरी उतरली.
पहा जिनेलियाचा नवीन लुक (Genelia Deshmukh)
याच बरोबर तिच्या सोशल मीडियावरील फोटोजना देखील प्रेक्षकांची बरीच पसंती मिळते.असेच, निळ्या रंगाच्या ड्रेस वरचे फोटोज जेनेलियाने, ‘No one is you- and , that is your superpower’ असे कॅप्शन देत शेअर केले आहेत. या लुक मध्ये जेनिलियाने फार दागिने नाही वापरलेत, परंतु तिच्या नाकातील रोजरिंग मुळे तिच्या या लूकला एक वेगळेपण आले आहे.तिच्या चेहऱ्यावरील आत्मविश्वास प्रेक्षकांना आकर्षित करतो. जिनेलिया च्या लूक्स मध्ये एक वेगळाच साधेपणा आणि निरागसपणा पहायला मिळतो. तिचा हाच निरागसपणा प्रेक्षकांना भावतो. (Genelia Deshmukh)
हे देखील वाचा : पुरस्कार स्वीकारल्यानंतर ‘अहो..’ म्हणत जेनेलियाच्या व्हायरल व्हिडिओचं होतंय कौतुक
त्यांच्या कामासोबत रितेश- जिनेलियाच्या जोडीकडे प्रेक्षक एक आदर्श जोडी व आदर्श पालक म्हणून बघतात. एकमेकांसोबतचे अनेक फोटोज व्हिडिओज ते शेअर करत असतात. त्यांना एकमेकांविषयी असणारा आदर कायमच पहायला मिळतो. आणि हे गोष्ट खरंच त्यांच्याकडून शिकण्यासारखी आहे.पालक म्हणून ही ते आपल्या मुलांना संस्कार, संस्कृती हे सगळं मनापासून शिकवण्याचं प्रयत्न करत असतात. सर्वच अर्थाने जिनेलिया ही एक आदर्श वाटते.