सिनेसृष्टीमधील लाडक कपल म्हणजे रितेश देशमुख आणि जिनिलीया देशमुख अवघ्या महाराष्ट्राने दादा-वहिनी म्हणून या जोडप्याला त्यांच्या मनात महत्वाचं स्थान दिल आहे. त्यांच्या जोडीकडे आदर्श जोडी म्हणून पहिले जाते.त्यांचे फोटोज,व्हिडिओज कायम चर्चेत असतात.एकमेकांसोबत अनेक रोमँटिक तसेच फनी रिल्स ते शेअर करत असतात.(Genelia post for Rahyl)
‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटाने त्या दोघांनी करिअरची सुरुवात केली.२० वर्षाचा करिअरचा प्रवास त्यांनी गाठला आहे. लग्नानंतर जिनिलीयाने काही काळ सिनेसृष्टी पासून ब्रेक घेतला होता.बऱ्याच काळानंतर वेड या चित्रपटातून तिने काम बॅक केले. आणि या चित्रपटातील रितेश जिनिलीयाच्या जोडीला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले.
पाहा काय आहे जिनिलीयाची पोस्ट?(Genelia post for Rahyl)
जोडी सोबत रितेश-जिनिलीया पालक म्हणून ही आदर्श मानले जातात. रिआन आणि रायल ही सोशल मीडियावर अनेकदा चर्चेत असतात. त्यांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल होताना पाहायला मिळतात.जिनिलीया तिच्या मुलांसाठी कायम खास पोस्ट करत असते.आज रायलच्या वाढदिवसानिमीत्त जिनिलीयाने त्याच्या सोबतचे पोस्ट इंस्टाग्राम अकाउंट वरून शेअर केला आहे. त्या पोस्टला तिने भावुक असे कॅप्शन दिले आहे.
हे देखील वाचा : दादा वहिनीची IPL डेट

मुलं मोठी होतात, तशी ती पालकांवर कमी अवलंबुन असतात.याची जाणीव जिनिलीयाच हे कॅप्शन वाचून होते.त्यात तिने म्हंटल आहे,प्रिय बाळा, प्रत्येक वर्ष पुढे जात तस तू माझ्या कडून एक गोष्ट हिरावून घेतोस.तुला आता चालण्यासाठी माझी गरज नाही. स्वतःच्या स्वप्नांच्या मागे धावण्याचं सामर्थ्य तुझ्यात आहे.तुला आता फक्त आई बाबांची गरज नाही, कारण तुझ्याकडे आता तुझे मित्र आणि शिक्षक देखील आहेत.तुझे बाबा आणि मी कोपऱयातून तुझ्यातल्या त्या लहान माणसाला बघत असतो, ज्याचा आम्हला सार्थ अभिमान आहे.मी आणि तुझ्या बाबाने एकमेकांना वचन दिल आहे, कि जो मार्ग तू निवडशील त्यात आम्हला तुझ्या सोबत असायचं आहे.हॅपी बर्थडे रायल.तुझं फुटबॉल आणि मेसी वर जितकं प्रेम आहे त्याहून जास्त माझं तुझ्या वर प्रेम आहे.(Genelia post for Rahyl)
