Gautami Deshpande and Swanand Tendulkar Marriage : अभिनेत्री गौतमी देशपांडे व स्वानंद तेंडुलकर ही जोडी नुकतीच विवाहबंधनात अडकली आहे. गौतमी-स्वानंदच्या लग्नाची काही दिवसांपासून बरीच चर्चा सुरु होती. गौतमी स्वानंदच्या लग्नसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. शाही थाटामाटात या दोघांचा विवाहसोहळा उरकला आहे. काही दिवसांपासून गौतमी व स्वानंद यांच्या लग्नाच्या चर्चा सुरु होत्या. त्यांनतर थेट मेहंदी सोहळ्याचे फोटो शेअर करत त्यांनी त्यांच्या नात्याची जाहीर कबुली दिली. शिवाय गौतमी व आशिष यांच्या हळदी समारंभाच्या फोटोंनीही साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं.
लग्नानंतर अभिनेत्रीच्या रिसेप्शनच्या फोटोंनीही सोशल मीडियावर धुमाकुळ घातला. गौतमी-स्वानंद यांचं जवळच्या नातेवाईकांच्या व मित्रपरिवाच्या साक्षीने थाटामाटात पुण्यात लग्न पार पडलं. गौतमी-स्वानंद यांच्या लग्नात अनेक कलाकार मंडळीनी हजेरी लावलेली पाहायला मिळाली. लग्न पार पडल्यानंतर गौतमी व स्वानंद यांनी त्यांच्या लग्न संमारंभातील फोटोज सोशल मीडियावर पोस्ट केले ज्यावर अनेक कलाकार मंडळीनी या दोघांच्या त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
तर याचबरोबर गौतमीच्या चाहत्यांनीही तिने पोस्ट केलेल्या फोटोखाली तिला शुभेच्छा दिल्या आहेत. याशिवाय काहींनी “विराजसला नाही बोलवलस का गौतमी” असा प्रश्न अभिनेत्रीला विचारला आहे. गौतमी व विराजस यांनी ‘माझा होशील ना’ या मालिकेत एकत्र काम केलं होतं तेव्हापासून ही जोडी प्रेक्षकांच्या आवडत्या जोडींपैकी एक होती. अशातच आता गौतमीच्या लग्नात विराजसची अनुपस्थिती पाहता चाहत्यांनी कमेंट करत प्रश्न विचारायला सुरुवात केली आहे.
गौतमी-स्वानंद यांच्या लग्नात सुखदा खांडकेकर, सारंग साठे, भाग्यश्री लिमये, सुखदा खांडकेकर यांसारख्या कलाकारांची उपस्थिती पाहायला मिळाली. गौतमीचा नवरा स्वानंद हा ‘भाडिपा’ या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये काम करत असल्यामुळे त्याच्या या खास हळदी समारंभाला ‘भाडिपा’चे सर्व्हेसर्वा सारंग साठ्ये व त्याची पत्नी पॉला यांनी खास हजेरी लावली. दरम्यान, गौतमी व स्वानंद यांच्या हळदी समारंभाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून या फोटोवर चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्सचा वर्षाव केला आहे.