गुरूवार, एप्रिल 23, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Swanandi Tikekar and Ashish Kulkarni Wedding : शुभमंगल सावधान! अखेर स्वानंदी टिकेकर व आशिष कुलकर्णी अडकले लग्नबंधनात, नववधूवराच्या साधेपणाची चर्चा

Saurabh Moreby Saurabh More
डिसेंबर 25, 2023 | 9:23 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Swanandi Tikekar and Ashish Kulkarni Marriage Marathi News

स्वानंदी टिकेकर आशिष कुलकर्णी दोघे लग्नबंधनात

Swanandi Tikekar and Ashish Kulkarni Marriage : गेले काही दिवस मराठी कलाविश्वात लग्नाची लगबग सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. गौतमी-स्वानंद पाठोपाठ गायिका, अभिनेत्री स्वानंदी टीकेकर व गायक आशिष कुलकर्णी देखील नुकतेच विवाहबंधनात अडकले आहेत. त्यांच्या लग्नसोहळ्याचे फोटो नुकतेच समोर आले आहेत. याआधी त्यांच्या मेहंदी, संगीत व हळदी सोहळ्याचे अनेक क्षण सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत होते. त्यांचे हे फोटो पाहून अनेकांना त्यांच्या लग्नाची आतुरता लागली होती आणि अखेर ही लोकप्रिय जोडी नुकतीच विवाहबंधनात अडकली आहे.

अगदी थाटामाटात स्वानंदी-आशिष यांचा विवाहसोहळा संपन्न झाला आहे. त्यांच्या या लग्नसोहळ्याला मराठी कलाविश्वातील अनेक कलाकारमंडळी, त्यांचे कुटुंबीय, तसेच जवळचे काही नातेवाईक व मित्रमंडळीही उपस्थित होते. फुलांनी सजलेल्या मंडपात अत्यंत पारंपरिक पद्धतीने त्यांचा विवाहसोहळा संपन्न झाला असल्याचं समोर आलं आहे. समोर आलेल्या फोटोंमध्ये नववधूवराचा आनंद ओसंडून वाहताना पाहायला मिळाला.

आणखी वाचा – गौतमी देशपांडेच्या लग्नात विराजस कुलकर्णीची अनुपस्थिती, नेटकरी म्हणाले, “त्याला नाही बोलवलंस…”

View this post on Instagram

A post shared by Majja (@its.majja)

स्वानंदी-आशिष यांच्या लग्नसोहळ्याचे फोटो समोर आले असून यांत दोघेही अत्यंत आनंदी दिसत आहेत. स्वानंदीने लग्नसाठी पिवळ्या रंगाची पैठणी नेसली आहे. त्यावर तिने घेतलेला हिरव्या रंगाचा शेला लक्षवेधी आहे. तर आशिषने लग्नासाठी पांढऱ्या रंगाची शेरवानी परिधान केली आहे. अंत्यत साधा व आकर्षक अशा दोघांचा लूक प्रेक्षकांनाही विशेष भावला आहे.

आणखी वाचा – मराठमोळा पेहराव अन् पारंपरिक दागिने; स्वानंदी-आशिषच्या लग्नाच्या लूकवर पैठणीचा साज

‘दिल दोस्ती दुनियादारी’ या लोकप्रिय मालिकेमधून स्वानंदी घराघरांत पोहोचली. स्वानंदी ही अभिनेत्री असण्याबरोबरच एक उत्तम गायिकादेखील आहे. तिने सिंगिंग स्टार या गाण्याच्या शोमध्ये सहभाग घेतला होता. तसेच आशिष हादेखील एक उत्तम गायक असून त्यानेदेखील ‘इंडियन आयडल’सारख्या शोमध्ये भाग घेतला होता. काही दिवसांपूर्वी स्वानंदी-आशिष यांनी ‘आमचं ठरलंय’ म्हणत त्यांच्या प्रेमाची कबुली दिली होती. नंतर काही दिवसांनी अगदी दिमाखात त्यांचा साखरपुडादेखील संपन्न झाला होता आणि अखेरीस ही जोडीदेसखील विवाहबंधनात अडकल्यामुळे चाहत्यांना आनंद झाला आहे.

Tags: ashish kulkarni weddingentertainmentmarathi actressswanandi tikekarSwanandi Tikekar Wedding
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

 divyanka sirohi death reason
Entertainment

सुप्रसिद्ध पंजाबी अभिनेत्रीचे वयाच्या ३०व्या वर्षी निधन, घरीच मृतावस्थेत आढळली, मृत्यूचे कारण…

एप्रिल 23, 2026 | 3:00 pm
veen doghatli hi tutena serial
Entertainment

भयंकर ऊन, घामाच्या धारा अन्…; ‘वीण दोघांतली…’च्या कलाकारांनी ४५ मिनिटांत पूर्ण केलं शूट, बहरणार रोमान्स

एप्रिल 22, 2026 | 2:50 pm
Puja Banerjee pregnant
Entertainment

टेलिव्हिजनची ‘पार्वती’ दुस-यांदा प्रेग्नंट, पळून जाऊन वयाच्या १५व्या वर्षी केलेलं लग्न, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

एप्रिल 22, 2026 | 1:00 pm
Aishwarya Rai updates
Entertainment

“आई ती शेवटी आईच”, एअरपोर्टवर लेकीला घ्यायला पोहोचले ऐश्वर्या-अभिषेक, आराध्याचे फोटोही काढले आणि….

एप्रिल 22, 2026 | 11:00 am
Next Post
rang maza vegla fame actress manasi ghate married with akash pandit photo viral on social media

गौतमी व स्वानंदी पाठोपाठ 'ही' मराठमोळी अभिनेत्री अडकली विवाहबंधनात, सोशल मीडियावर शेअर केले खास क्षण

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.