Swanand Tendulkar and Gautami Deshpande Wedding : अभिनेत्री गौतमी देशपांडे व स्वानंद तेंडुलकर ही जोडी गेले अनेक दिवस सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत होती. गेले काही दिवस त्यांच्या लग्नाचे अनेक विधी सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत होते. त्यांचे मेहंदी, संगीत व हळदी सोहळ्याचे अनेक क्षण सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले. त्यांचे हे फोटो पाहून अनेकांना त्यांच्या लग्नाची आतुरता लागली होती आणि अखेर ही लोकप्रिय जोडी नुकतीच विवाहबंधनात अडकली आहे. त्यांकया लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून अल्पावधीतच या फोटोंना अल्पावधीतच तुफान प्रतिसाद मिळाला आहे. (Gautami Deshpande and Swanand Tendulkar Wedding)
गौतमी-स्वानंद यांचा विवाहसोहळा पुण्याच्या निसर्गरम्य वातावरणात अगदी शाही थाटामाटात संपन्न झाला आहे. पुण्यातील एका अलिशान रिसॉर्टमध्ये त्यांचा विवाहसोहळा पार पडला आहे. पुण्याच्या खडकवासलामधील ‘वाईल्डरनेस्ट’ या रिसॉर्टमध्ये गौतमी-स्वानंद विवाहबंधनात अडकले आहेत. या लग्नसोहळ्याला गौतमी-स्वानंद यांचे कुटुंबीय, जवळचे नातेवाईक, सिनेसृष्टीतील कलाकार तसेच मोठ्या मित्रपरिवाराने खास उपस्थिती लावली होती. गौतमी-स्वानंद यांच्या लग्नाचे हे खास क्षण सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.
आणखी वाचा – गौतमीच्या संगीत सोहळ्यात आईने गायलं खास गाणं, आईच्या गाण्यावर देशपांडे सिस्टर्सनी धरला ठेका
गौतमी-स्वानंद यांनी त्यांच्या लग्नासाठी खास पारंपरिक लूक केला आहे. गौतमीने या लग्नासाठी पेस्टल रंगाची साडी परिधान केली होती. तर या साडीला साजेसा असा साजशृंगार केला आहे. त्याचबरोबर अभिनेत्रीने या साडीवर अबोली रंगाचा शालदेखील परिधान केली आहे. अत्र स्वानंदनेही गौतमीच्या लूकला साजेसा असा पारंपरिक कुर्ता व धोतर परिधान केला असून त्यावर अबोली रंगाचा शेलादेखील परिधान केला आहे. गौतमी-स्वानंद यांनी त्यांच्या लूकने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. तर गौतमीच्या मोत्यांच्या मुंडावल्या विशेष लक्षवेधी ठरल्या आहेत.
आणखी वाचा – कुर्यात सदा मंगलम्! अखेर गौतमी-स्वानंदचा शाही विवाहसोहळा संपन्न, पहिला फोटो आला समोर
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या लग्नाचे अनेक विधी सोशल मीडियावर चाहत्यांना पाहायला मिळत होते. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांना लग्नाची चांगलीच उत्सुकता लागली होती आणि अखेर ही जोडी विवाहबंधनात अडकली आहे. त्यामुळे चाहत्यांना खूपच आनंद झाला आहे. या व्हायरल फोटोंवर गौतमी-स्वानंद यांच्या अनेक चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्स करत कौतुकाचा वर्षाव केला आहे.