राज्यभरात नवरात्रीची धूम पाहायला मिळत असून त्यानिमित्त अनेक ठिकाणी गरबा कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. लहानापासून मोठ्यांपर्यंत सर्वच जण एकत्र येत गरब्याचा आनंद लुटताना दिसत आहे. केवळ सर्वसामान्य नाही, तर अनेक कलाकार मंडळी या सणाचा आनंद लुटत आहे. ते विविध कार्यक्रमांना हजेरी लावत प्रेक्षकांच्या आनंदात सहभागी होताना दिसत आहे. प्रसिद्ध मराठी अभिनेत्री सई ताम्हणकरने अशाच एका कार्यक्रमाला हजेरी लावली आहे. या कार्यक्रमदरम्यानचा एक व्हिडिओ समोर आला, जो बराच व्हायरल होत आहे. (Sai Tamhankar Tarpa Dance viral video)
सईने नुकतंच मुंबईतील एका गरबा कार्यक्रमाला हजेरी लावली होती. तेव्हा तिच्या उपस्थितीत तेथील स्थानिक कलावंतांनी स्थानिक तारपा नृत्य केलं. हे पाहताना यावेळी सईला तारपा नृत्यावर थिरकण्याचा मोह आवरला नाही. आणि तिने तिथल्या कलावंतांसह तारपा नृत्यावर ठेका धरला. तसेच, तिने उपस्थित प्रेक्षकांना तिने नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तिचा हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून चाहत्यांनी कमेंटद्वारे सईवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
हे देखील वाचा – “अनेक धर्मग्रंथांनी आपल्याला…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम पृथ्वीक प्रतापची फेसबुक पोस्ट चर्चेत, म्हणाला, “वर्गीकरणाचा खेळ…”
‘तू ही रे’, ‘क्लासमेट्स’, ‘प्यारवाली लव्हस्टोरी’, ‘दुनियादारी’, ‘धुराळा’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये झळकलेली सई सध्या ‘श्रीदेवी प्रसन्न’ या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. त्याचबरोबर, ती एका हिंदी वेबसीरिजमध्ये झळकणार असल्याची चर्चा सुरु आहे. गेल्या काही दिवसांपासून ती तिच्या नवीन घरामुळे चर्चेत आली होती. तसेच, सोशल मीडियावरील फोटोशूट्सची देखील बरीच चर्चा होत असते.