या जगात हातावर मोजण्याइतकी लोकं असतील ज्यांना झोप ही गोष्ट प्रिय नसेल. माणूस आरामासाठी झोपतो, विश्रांती घेतो कोण दिवसभर थकून झोपतो, तर कोण दिवसभर काही न केल्यामुळेही झोपतोच. सामान्य माणूस असो, शेतकरी असो, नोकरी करणारा असो किंवा एखादा कलाकार झोप ही सगळ्यांना सारखीच. पण त्या झोपेवरही नितांत प्रेम करणारा एखादा कलाकाराचं असू शकतो.(Gaurav More Rohit Mane)
असंच काहीस झालंय महाराष्ट्राच्या हास्यजत्रेतील काही मंडळीं सोबत. हास्य जत्रेतील कलाकारांनी एक व्हिडिओ शेअर केलाय ज्या व्हिडिओ मध्ये महाराष्ट्राचा लाडका सावत्या म्हणजेच अभिनेता रोहित माने हा गाढ झोपेत दिसत आहे आणि गौरव प्रियदर्शनी या कलाकारांनी काही केल्या त्याची झोप मोडणं त्यांना शक्य होत नाहीये. अभिनेत्री प्रियदर्शनी ने एक व्हिडिओ तिच्या स्टोरी मध्ये शेअर केला आहे ज्यात हास्य जत्रेतील कलाकार एकत्र असून सावत्या हा गाढ झोपेत दिसतोय त्यावेळी त्याला झोपेतून जाग करण्याची स्पर्धा बाकीच्या कलाकारानं मध्ये लागल्याचं व्हिडिओ मध्ये दिसून येतंय.

तर सावत्याची झोप उडवण्याचं मिशन हाती घेतली फिल्टर पाड्याचा बच्चन म्हणून प्राईसद्ध असणाऱ्या गौऱ्याने म्हणजेच अभिनेता गौरव मोरेने. व्हिडिओत तो म्हणतोय सावत्याला झोपेतून उठवण्याचे वेग वेगे प्रकार आणि सावत्याच्या बोलीतच तो मोठ्याने ओरडताना दिसतोय तरीही सावत्याची झोप मोडणं काही त्यांना शक्य होत नसल्याचं दिसतंय.(Gaurav More Rohit Mane)
हे देखील वाचा – स्टार प्रवाहची नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला मुलगी झाली हो नंतर पुन्हा मुख्य भूमिकेत दिसणार अभिनेत्री दिव्या सुभाष
महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमातून ही सगळी मंडळी आपल्याला खळखळून हसवताना दिसतात. प्रेक्षकांच्या घरातील एखाद्या सदस्याप्रमाणे आज हा कार्यक्रम घराघरात पोहचला. सातत्याने असा निखळ विनोद करणं ही झोप्पी गोष्ट नसते त्यामुळे एखाद्या कलाकाराला अशी गाढ झोप येन हे साहजिकच आहे.