मंडळी मनोरंजन क्षेत्रात विनलेल मालिकांचं जाळ आज आपण पाहतो अनेल कलाकार वेळी विविध विषय घेऊन प्रेक्षकांसमोर येतात त्यातील काही कथा आणि ती कथा पार पाडणारे नायक, नायिका प्रेक्षकांच्या नेहमीच आठवणीत राहतात मग तो कलाकार सतत टीव्ही वर दिसो किंवा न दिसो. एखादी मालिका जेव्हा प्रेक्षकांचा निरोप घेते तेव्हा त्यातील कलाकारांना पुन्हा एकदा टीव्ही वर पाहावं अस प्रेक्षकांना वाटतं असत. असच काहीस घडलय अभिनेत्री दिव्या सुभाष पुगावकर सोबत.(Divya Subhash New Serial)

प्रेमा तुझा रंग कसा या मालिके नंतर स्टार प्रवाह वरील लोकप्रिय ठरलेल्या ‘ मुलगी झाली हो ‘ या मालिकेतून दिव्या पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस आली होती . या मालिकेत दिव्या ने साकारलेलं माऊ हे पात्र प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरल. घरा घरात प्रेम मिळवलेली माऊ पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाली आहे. स्टार प्रवाह वाहिनी लवकरच ‘ ‘मन धागा धागा जोडते नवा’ ही मालिका प्रेक्षकांच्या मनोरंजासाठी प्रदर्शित करत आहे या मालिकेतून दिव्याची पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर एन्ट्री होणारं असल्याची चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे.

नव्या भूमिकेविषयी सांगताना दिव्या म्हणाली, ‘स्टार प्रवाह वाहिनीसोबत माझ्या आयुष्यातली मी पहिली मालिका केली होती. पुन्हा एकदा या लाडक्या वाहिनीसोबत काम करताना आनंद होतोय. मुलगी झाली हो मालिकेत न बोलता खूप काही व्यक्त करण्याचं आव्हान होतं. या मालिकेत मी बोलणार तर आहे पण मनात खूप साऱ्या भावना साचवून. त्यामुळे आनंदी ही व्यक्तिरेखा एक अभिनेत्री म्हणून जास्त आव्हानात्मक आहे.(Divya Subhash New Serial)
हे देखील वाचा – नक्की कावेरी करत काय होती?कावेरीचा मजेशीर व्हिडिओ पाहून प्रेक्षक म्हणाले…
मुलगी झाली हो या मालिकेतील मऊ हे पात्र सगळ्या प्रेक्षकांना आवडलं या मालिकेत दिव्या ने म्हणजे माऊने मुख अभिनय केला कोणताही संवाद नसताना तिने केलेला अभिनय ही प्रेक्षकांच्या कौतुकास पात्र ठरला. वडिलांनी न स्वीकारलेलं मुळीच अस्तित्व तरीही वडिलांवर जीवापाड प्रेम करणारी लेक. वडिलांचा वाचवलेला जीव आणि त्या नंतर बहरणार बाप लेकीचं नातं या वर भाष्य करणारी मुलगी झाली हो या मालिकेचं नाव प्रेक्षक आजही विसरल्याचं दिसत नाहीत.