दोन दिवसापूर्वी जेष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या निधनाची बातमी समोर आली. त्यांच्या आकस्मिक निधनाने त्यांच्या कुटुंबाप्रमाणेच मराठी सिनेसृष्टी देखील हळहळली.रवींद्र महाजनी हे काही दिवसांपासून तळेगाव दाभाडेजवळील आंबी गावात ते भाड्याने राहत होते, तिथेच फ्लॅटमध्ये त्यांचा मृतदेह आढळला.प्रथम दर्शनी पाहता साधारण दोन दिवसांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला असावा, असं अंदाज वर्तवण्यात आला होता. (gashmeer mahajani troll after ravindra mahajani death)
त्यांच्या मृत्यूविषयी अनेक चर्चाना उधाण आले.अनेक जर तर मध्ये विधान बाहेर येऊ लागली. २ दिवसापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता तर कुटुंबीयांनी संपर्क करण्याचा प्रयत्न केला नाही का? रवींद्र महाजनी यांचा मुलगा अभिनेता गश्मीर महाजनी हा इतका मोठा अभिनेता असताना वडील भाडयाने का राहायचे? हे आणि यासारखे अनेक प्रश्न उद्भवू लागले.
गश्मीरवर संतापले नेटकरी (gashmeer mahajani troll after ravindra mahajani death)
कलाकार म्हंटल कि त्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीबद्दल त्यांच्या प्रेक्षकांचं, चाहत्यांच काही ना काही मत असत. आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून वेळोवेळी ते मत व्यक्त करत असतात.रवींद्र महाजनी यांच्या मृत्यबद्दल ज्या गोष्टी समोर येत आहेत त्यामुळे गश्मीरच्या एका व्हिडिओ वर कमेंट्स करून प्रेक्षकांनी नाराजी व्यक्ती केली आहे.त्यात असं म्हणण्यात आलं आहे,गश्मीर मला खूप आवडायचा, पण तुझे वडील कुठे आहेत, काय करत आहेत याची तुला तुझ्या बायकोला काळजी नसावी, अरे त्यांचा फोन लागत नाही किंवा ते उचलत नसतील याची काळजी नसावी, की फक्त स्वतःच्याच धुंदीत राहायचं.तुम्ही लोक फार निर्दयी आहात. हे आज परत एकदा जाणवलं वडिलांना म्हातारपणात एकटं सोडावं ते ही इतकं की त्यांचा देहच उरावा.या आणि यासारख्या अनेक कमेंट्स पाहायला मिळत आहेत. (gashmeer mahajani troll after ravindra mahajani detah)
पंरतु प्रत्येक नाण्याच्या दोन बाजू असतात, गश्मीरच्या विरोधात बोलणारे जसे आहेत, तसेच त्याची ही काही तरी बाजू असेल, काहीही माहित नसताना त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल इतकी मोठी विधान करणं चूक आहे असं मानणारे देखील गश्मिरचे चाहते आहेत.अनेकांनी असं देखील म्हंटल आहे, की खूप आधीपासून गश्मिरचे आई वडील वेगळे राहायचे.खूप लहान वयापासून गश्मीर कुटुंबाला सांभाळतो आहे,तर काहींनी असं देखील म्हंटल आहे,तुम्ही स्वतः त्यांचं आयुष्य पाहिलं आहे का? त्यांच्या कौटुंबिक गोष्टी तुम्हला माहित आहेत का? प्रत्येकाला प्रत्येकाचं आयुष्य जगण्याचा हक्क आहे.असं म्हणत गश्मीरला पाठिंबा दिला आहे. तर अभिनेत्री हेमांगी कवीने देखील गश्मीरला पाठिंबा दर्शवला आहे.(gashmeer mahajani troll after ravindra mahajani death)