सध्या सगळीकडे ‘गदर २’ चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. जवळपास २२ वर्षांनी ‘गदर एक प्रेमकथा’ चित्रपटाचा सीक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये अधिक उत्सुकता निर्माण झाली आहे. आतापासूनच ‘गदर २’च्या तिकीटांचं आगाऊ बुकिंग सुरु झालं आहे. या चित्रपटाच्यानिमित्ताने सनी देओल व अमीषा पटेल ही जोडी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अमीषाला रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक झाले आहेत.
अमीषाने याआधी रुपेरी पडद्यावर उत्तमोत्तम भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. तिने अधिकाधिक मेहनत करत बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींच्या यादीमध्ये स्थान मिळवलं. पण तिचा इथवरचा प्रवास काही सोपा नव्हता. तिच्या संपूर्ण करिअरमध्ये बरेच चढ-उतार आले. तसेच तिचं खासगी आयुष्यही कायमच चर्चेत राहिलं. ‘कहो ना प्यार है’, ‘गदर’ हे तिचे दोन्ही चित्रपट सुपरहिट ठरले.
आणखी वाचा – Video : सुंदर सजावट, छोटं स्वयंपाक घर अन्…; आतून असं आहे प्राजक्ता माळीचं घर, पाहा व्हिडीओ
करिअरच्या सुरुवातीलाच सुपरहिट चित्रपट दिल्यानंतर कालांतराने अमीषाच्या करिअरला उतरली कळा लागली. खासगी आयुष्यामुळे अमीषाला तिच्या करिअरमध्ये अपयश आलं असं बोललं जातं. करिअरच्या सुरुवातीलाच तिचं तिच्या आई-वडिलांबरोबर भांडण झालं. तिने तिच्या आई-वडिलांवर काही गंभीर आरोप केले. वडील तिचे सगळे पैसे घेत असल्याचे तिने आरोप केले. हा संपूर्ण प्रकार प्रसार माध्यमांसमोरही आला होता. इतकंच नव्हे तर अमीषाचं हे प्रकरण कोर्टात पोहोचलं.
आई-वडील मिळालेल्या पैश्यांचा चुकीचा वापर करत आहेत असा अमीषाने आरोप केला. मात्र आई-वडिलांना विरोध करत असताना तिला त्यांनी चपलीने मारलं. आई-वडिलांनी १२ कोटी रुपये घेतले असल्याचा खटला तिने कोर्टात दाखल केला. शिवाय दिग्दर्शक विक्रम भट्टबरोबरचं अमीषाचं नातंही बरंच गाजलं. विक्रम व अमीषाचं नातं तिच्या आई-वडिलांना मान्य नव्हतं. खासगी आयुष्यामुळे अमीषाच्या करिअरवर त्याचा परिणाम झाला.