बॉलिवूड अभिनेता सनी देओल सध्या ‘गदर २’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. २२ वर्षांपूर्वी आलेल्या चित्रपटाच्या या सिक्वेलने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली आहे. चित्रपटाने आतापर्यंत ४७५ कोटींचा गल्ला जमवला असून तो लवकरच ५०० कोटींच्या क्लबमध्ये सामील होणार आहे. चित्रपटाचे हे यश तो चित्रपटातील सहकलाकार व त्याच्या कुटुंबासोबत साजरा करताना दिसत आहे. (Sunny Deol)
एरव्ही त्याच्या खासगी आयुष्याबाबत बोलणं टाळणारा सनी देओल सध्या अनेक खुलासे करताना दिसतोय. नुकताच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्याने त्याच्या खासगी आयुष्यात घडलेला एक किस्सा सांगितला आहे. एका पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीत सनीने त्याच्या आयुष्यात घडलेला एक किस्सा शेअर केला. सनी देओल व त्याच्या काही मित्रांनी एका मुलीची छेड काढली होती. नंतर त्या मुलीच्या भावाने थेट सनीचा त्याच्या घरापर्यंत पाठलाग केला असल्याचा खुलासा केला आहे.
हे देखील वाचा – सुप्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीचा धक्कादायक मृत्यू, राहत्या घरी आढळला मृतदेह, निधनामागचं नेमकं कारण काय?
हा किस्सा सांगताना सनी म्हणाला, “मी व माझे मित्र आम्ही कारमधून जात होतो. तेव्हा तिथे एक सुंदर मुलगी रस्त्यावरून जाताना दिसली. त्यावेळेस मी तिला काहीतरी बोललो होतो. पण जेव्हा मी घरी पोहोचलो, तेव्हा समजलं की त्या मुलीचा भाऊ माझा पाठलाग करत होता. जेव्हा त्या मुलीचा भाऊ माझ्या घरापर्यंत पोहोचला तेव्हा माझे सर्व सुरक्षारक्षक बाहेर आले. तेव्हा मी त्याला बोललो की, यात माझी चूक असून जर तुम्हाला मला मारायचे असेल तर मला मारू शकता. कारण जर मी तुमच्या बहिणीला काही बोललो असेल, तर मी चुकीचा आहे. अशाप्रकारे जेव्हा मी कुठे चुकीचा वागत असेल, तर मी ते कबूल करतो.
हे देखील वाचा – Video : घरातील सत्यनारायणाच्या पूजेदिवशी ऐश्वर्या-अविनाश नारकरांचा गॉगल घालून जबरदस्त डान्स, नेटकरी म्हणतात, “म्हातारे झाले तरीही…”
पुढे त्याला एक व्हिडिओ दाखवण्यात आला. ज्यामध्ये अभिनेता चाहत्यावर ओरडताना दिसत आहे. हा व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला होता. तसेच त्यावर अनेक प्रतिक्रिया आल्या होत्या. त्यावर बोलताना सनीने हा चाहता पुन्हा भेटल्यास त्याला मिठी मारणार असल्याचं सांगितलं आहे. (Sunny Deol)