मराठी कलाकारांप्रमाणेच सध्या जिचं नाव बरंच चर्चेत असत अशी नृत्यांगना म्हणजे गौतमी पाटील. तिच्या नावाची राज्यभरात बरीच क्रेझ आहे. खूप कमी वेळात तिने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. ती तिच्या वेगळ्या अदांसाठी प्रसिद्ध आहे. राज्यभरात तिचा मोठी चाहतावर्ग आहे. आजवर तिने ‘सबसे कातील गौतमी पाटील’ या एकाच वाक्याने बरेच कार्यक्रम गाजवले आहेत. गौतमी सध्या तिच्या नवीन गाण्यामुळे बरीच चर्चेत आहे. नुकताच तिच्या नवीन गाण्याचा टिझर प्रदर्शित झाला होता. आता तिचं गाणं देखील तरुणाईला वेड लावत आहे.(gautami patil new song release)
त्यात तिचा लावणी कार्यक्रमापेक्षा वेगळा अंदाज पहायला मिळत आहे. या गाण्यात तिचा नवा तडका पहायला मिळाला. हे गाणं सध्या सोशल मीडियावर बरंच व्हायरल होत आहे. गेल्या काही दिवसांपासून गौतमीने स्वतःचं ओळख तयार केलं आहे. महाराष्ट्रात तिचे होणारे कार्यक्रम आणि त्या कार्यक्रमाला मिळणारा प्रेक्षकांचा प्रतिसाद प्रचंड मोठा आहे. त्यामुळे तिने शेअर केलेल्या व्हिडीओ, फोटोंना खूपच प्रतिसाद मिळत आहे. असाच प्रतिसाद तिने शेअर केलेल्या तिच्या नव्या गाण्याच्या टिझरला मिळाला होता.
वाचा – गौतमी पाटीलचं नवीन गाणं तुम्ही पाहिलत का?
आणखी वाचा – ‘केबीसी १५’ चा पहिला करोडपती ठरला पंजाबचा २१ वर्षीय युवा, जिंकेल का ७ करोड?
या व्हिडीओत गौतमी भल्या गर्दीत नाचताना दिसत आहे. तिच्या भोवती डान्स करणारे हातात दारुच्या बाटल्या घेऊन नाचत आहेत. शॉर्ट हिरव्या रंगाचा स्कर्ट व गुलाबी रंगाची चोळी, केसात गजरा, कपाळावर हिरवी टिकली असा लूक तिने या गाण्यासाठी केला आहे. ‘माझा कारभार सोपा नसतोय रं’ असे या गाण्याचे बोल आहे. गौतमीने शेअर केलेल्या या व्हिडीओवर १९ हजारांपेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत. सोशल मीडियावर या गाण्याच्या टिझरने बराच धुमाकुळ घालत होता. आता कालच आलेल्या गाण्याने तरुण मुलांना वेड लावलं आहे.
नेटकऱ्यांनी तिच्या गाण्याच्या व्हिडीओवर कमेंट करत गाण्याला पसंती दिली आहे. बऱ्याच नेटकऱ्यांनी कमेंट करत तिला शुभेच्छाही दिल्या आहेत. काही दिवसांपूर्वी ती एका चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं बोललं जात होतं. ही बातमी तिच्या चाहत्यांसाठी खूपच आनंद देणारी आहे. तिच्या चाहत्यांमध्ये आता नव्या चित्रपटाची उत्सुकता लागून आहे.