मिस वर्ल्ड स्पर्धेतील स्पर्धक शेरिका डी अरमास हिचं वयाच्या २६व्या वर्षी निधन झालं. तिने २०१५ साली उरुग्वे देशाचं प्रतिनिधित्व केलं होतं. मीडिया रिपोर्टनुसार, ती बरीच वर्षे सर्वाइकल कर्करोगाशी झुंज देत होती. तिची बऱ्याच वर्षांपासून केमोथेरपी व रेडिओथेरपी चालू होती. पण या संघर्षमय प्रवासातून तिने १३ ऑक्टोबरला जगाचा अखेरचा निरोप घेतला. (miss world contestant sherika de armas dies)
२०१५मध्ये मिस वर्ल्ड स्पर्धेत भाग घेतलेल्या अवघ्या १८ वर्षांच्या ६ मुलींपैकी आर्मस ही एक होती. त्या स्पर्धेतील ती एक अशी स्पर्धेक होती जिच्यात बरीच महत्त्वकांक्षा व उत्साह होता. पण तिची टॉप ३० मध्ये निवड होऊ शकली नाही. त्या स्पर्धेतील तिची एक मुलाखत होती ज्यात तिने तेथील स्थानिक मीडियाबरोबर संवाद साधला होता. त्यावेळी तिने तिच्या आयुष्यभराच्या स्वप्नाबद्दल भाष्य केलं होतं. अरमास म्हणाली होती, “मला नेहमीच मॉडेलिंग या क्षेत्रात करिअर करायचं होतं. मग ती मला जाहिरातींमध्ये काम करण्याची संधी असो, ब्युटी मॉडेल म्हणून असो किंवा कॅटवॉक असो”.
ती पुढे म्हणाली होती, “मला फॅशनसंबंधित प्रत्येक गोष्ट आवडते. मला वाटतं की कोणत्याही मुलीचं या स्पर्धेत सहभागी होण्याचं स्वप्न असावं. मला आव्हानांनी भरलेला हा प्रवास अनुभवतला आला यासाठी मी खूप आनंदी आहे”, असं सांगत अरमासने आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. तिच्या जाण्याने तिच्या कुटुंबिय व मित्रपरिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. याबाबत त्यांनी सोशल मीडियावर शोक व्यक्त केला. तिच्या भावाने पोस्ट केली. मायक डी आरमास लिहीतो, ‘नेहमी व कायमचं उंज उड छोट्या बहिणी’.
२०२१च्या मिस उरुग्वे लोला डे लॉस सॅटोस हिनेही आपल्या भावना व्यक्त करत लिहीलं की, “मला नेहमी तुझी आठवण येईल. तु देलेला पाठिंबाच नाही तर मला प्रगती पथावर पाहण्याचा तु किती तत्पर होतीस, परत तुझा स्नेह, जिव्हाळा, आनंद आणि आपली मैत्री जी आजही माझ्याबरोबर आहेत”, असं लिहीत तिने तिची आठवण काढली आहे.