ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेत्री हेमा मालिनी यांनी नुकतीच वयाची पंच्याहत्तरी पार केली आहे. त्यांचा ७५वा वाढदिवस सोमवारी मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्यात आला होता. यावेळी आयोजित पार्टीला अभिनेत्रीच्या कुटुंबियांसह बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली होती. दरम्यान, या पार्टीचे व्हिडिओज सोशल मीडियावर समोर आले, ज्याची चर्चा सध्या होत आहे. (Hema Malini Birthday Party)
ज्यांनी आपल्या अभिनयाने व अदाकारीने बॉलिवूडमधील एक काळ गाजवला होता, त्या हेमा मालिनी यांचा काल वाढदिवस पार पडला. यावेळी तिचा पती व अभिनेता धर्मेंद्र, मुली ईशा व अहाना, त्यांचे पती व मुलं उपस्थित होते. तसेच ज्येष्ठ अभिनेत्री रेखा, जया बच्चन, पद्मिनी कोल्हापुरे, जॅकी श्रॉफ, अनुपम खेर, सलमान खान यांसारख्या अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. या वाढदिवस पार्टीचा व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये त्या पती धर्मेंद्र व मुलींसह केक कापताना व धर्मेंद्र यांना केक भरवताना दिसत आहे. तर आणखी एका व्हिडिओमध्ये त्या धर्मेंद्र यांच्यासह त्यांच्या ‘ड्रीम गर्ल’ या लोकप्रिय गाण्यावर थिरकताना दिसले आहेत.
हे देखील वाचा – मिस वर्ल्ड स्पर्धेत सहभागी झालेल्या शेरिका डी अरमासचं निधन, २६व्या वर्षी कर्करोगाशी सुरु असलेली लढाई ठरली अपयशी
यावेळी हेमा मालिनी यांनी गुलाबी रंगाची साडी, तर धर्मेंद्र यांनी निळ्या रंगाचा सूट परिधान केला होता. ते दोघंही यावेळी सुंदर दिसत होते. तसेच आणखी एका व्हिडिओमध्ये त्या रेखा यांच्यासह ‘क्या खूब लगती हो” गाण्यावर डान्स करताना दिसल्या आहेत. त्यांच्या या सोहळ्यातील अनेक व्हिडिओज व्हायरल होत असून चाहते या व्हिडिओवर प्रतिक्रिया देत त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहे.
हे देखील वाचा – ६९वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा आज पार पडणार, केव्हा व कुठे पाहता येणार?, आलिया भट्ट, अल्लू अर्जुन, एसएस राजामौली, करण जोहर यांचा समावेश
यावेळी हेमा मालिनी यांनी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करताना तिने उपस्थित पापाराझींना पोझ दिली आहे. तसेच, जुही चावला, राणी मुखर्जी, माधुरी दीक्षित, विद्या बालन, राजकुमार राव, आयुष्मान खुराणा या कलाकारांनीदेखील त्यांच्या वाढदिवसाला हजेरी लावली होती.