गुरूवार, एप्रिल 23, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

कोणी कपडे पळवले तर कोणी चोरल्या चपल्या अन्…; ‘नटरंग’च्या शूटिंगदरम्यान रवी जाधव यांची झाली होती अशी अवस्था, लाखो रुपयांची नोकरी सोडली आणि…

Majja Webdeskby Majja Webdesk
ऑक्टोबर 16, 2023 | 6:20 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
ravi jadhav share experience about their movie

ravi jadhav share experience about their movie

मराठी चित्रपटसृष्टीत असे बरेचसे चित्रपट आहेत ज्यांनी आपली वेगळी छाप सोडली आहे. अशा हिट चित्रपटांमागे महत्त्वपूर्ण भूमिका निभावतो तो दिग्दर्शक. मराठीतील चित्रपटांपैकी असे चित्रपट जे प्रेक्षकांच्या आजही लक्षात आहेत ते म्हणजे दिग्दर्शक रवि जाधव यांचा ‘नटरंग’ चित्रपट. हा चित्रपट बनला, त्याची गाणी ही हिट ठरली आणि पुढे तो चित्रपटही बराच गाजला. पण ही सगळी चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरची कथा आहे.पण त्याअगोदर रवि जाधवांनी हा चित्रपट बनवण्यासाठी किती कष्ट घेतले किंवा हा चित्रपट कसा साकार झाला याबाबत नुकतंच रवि जाधव यांच्या भावाने ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’च्या मैत्री स्पेशल भागात सांगितलं. त्यावेळी रवि जाधव यांनी टाईमपास चित्रपटाबद्दलही खुलासा केला. (ravi jadhav share experience about their movie)

रवि जाधव यांना ‘नटरंग’ चित्रपटाची कल्पना नेमकी कशी सुचली हे सांगताना त्यांचे मोठे भाऊ म्हणाले, “‘नटरंग’ नावाची कादंबरी वाचताना रविला वाटलं की यावर आपण चित्रपटच बनवूया. रविने घरी येऊन बाबांना सांगितलं की उद्यापासून मी नोकरी सोडतो. बाबांनी कारण विचारलं तर बोलला मला चित्रपट बनवायचा आहे. बाबांनी समजवायचा प्रयत्न केला पण तो ऐकला नाही आणि लाख रुपयांची नोकरी सोडून त्याने शुटिंगला सुरुवात केली. शुटिंगच्या पहिल्या दिवसापासून बऱ्याच अडचणी आल्या. जसे कपडे आणले ते लोक पळवून घेऊन जात होते. चपला आणल्या त्या पळवून नेल्या. तरीही पण त्याने हार नाही मानली. चित्रपट पूर्ण केला”.

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

आणखी वाचा – प्लॅटफॉर्मवरच झोपायचे, पेपर टाकण्याचं काम अन्…; रिक्षा चालवणाऱ्या रवी जाधव यांच्या भावाने सांगितलं खरं सत्य, म्हणाले, “पैशांची अडचण होती तेव्हा…”

या आठवणींवर बोलताना रवि म्हणाले, “मला एवढं आठवतं की, ‘नटरंग’ चित्रपटाची गाणी चालायला लागली तेव्हा मला पहिली प्रतिक्रिया राजूकडून आली. कारण कॉलेजला जाणारी मुलं रिक्षामध्ये गाणी ऐकायची तेव्हा तो सांगयचा की तुझं गाणं खूप चांगलं आहे लोक पुन्हा पुन्हा ऐकतात”.

आणखी वाचा – Bigg boss 17 : एकमेकांची कॉलर पकडली, अंगावर धावून गेले अन्…; ‘बिग बॉस’च्या घरामध्ये पहिल्याच दिवशी हाणामारी, अंकिता व विकीमध्येही बिनसलं

‘टाईमपास’ चित्रपटाबद्दल बोलताना रवि सांगतात, “मला बरेच लोक म्हणतात की ‘टाईमपास’मधली रिक्षा कुठून आली, अप्पा कुठून आले? तर अप्पा म्हणजे माझे बाबा व रिक्षा म्हणजे माझ्या भावाची रिक्षा. तो पेपर टाकणारा दगडू म्हणजे मी आणि ती मेघना. बाबा त्या वेळेला मारायचे तो पट्टाही आमच्या घरचाच”, असं सांगत रविंनी आपल्या नटरंग व टाईमपास या चित्रपटातील त्यांच्या आठवणी सांगितल्या.

Tags: marathi directornatarangravi jadhavtimepass
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

veen doghatli hi tutena serial
Entertainment

भयंकर ऊन, घामाच्या धारा अन्…; ‘वीण दोघांतली…’च्या कलाकारांनी ४५ मिनिटांत पूर्ण केलं शूट, बहरणार रोमान्स

एप्रिल 22, 2026 | 2:50 pm
Puja Banerjee pregnant
Entertainment

टेलिव्हिजनची ‘पार्वती’ दुस-यांदा प्रेग्नंट, पळून जाऊन वयाच्या १५व्या वर्षी केलेलं लग्न, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

एप्रिल 22, 2026 | 1:00 pm
Aishwarya Rai updates
Entertainment

“आई ती शेवटी आईच”, एअरपोर्टवर लेकीला घ्यायला पोहोचले ऐश्वर्या-अभिषेक, आराध्याचे फोटोही काढले आणि….

एप्रिल 22, 2026 | 11:00 am
Deepali Sayed Home Coming
Entertainment

घरापासून लांब, मानसिक ताण आणि…; १०० दिवसांनी घरी परतताच दीपाली सय्यदच जंगी स्वागत, म्हणाली, “उंबरठ्यावर…”

एप्रिल 22, 2026 | 9:55 am
Next Post
Rutuja Bagwe new Home

Video : ऋतुजा बागवेने खरेदी केलेलं नवीन घर आतून नेमकं कसं आहे?, बेडरुम आहे फारच खास, पाहा व्हिडीओ

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.