शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Fighter Movie Review : दीपिका पदुकोण व हृतिक रोशनचा ‘फायटर’ चित्रपट पाहावा की नाही, पहिला Review समोर, प्रेक्षक म्हणाले…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जानेवारी 25, 2024 | 1:28 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
Fighter First Review

Fighter Movie Review : दीपिका पदुकोण व हृतिक रोशनचा 'फायटर' चित्रपट पाहावा की नाही, पहिला Review समोर, प्रेक्षक म्हणाले...

Fighter First Review : हृतिक रोशन व दीपिका पदुकोणच्या ऍक्शन चित्रपट ‘फायटर’ची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. अखेर आज हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. ‘पठाण’ फेम दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदच्या ‘फायटर’ या सिनेमाची चाहत्यांमध्ये खूप मोठी क्रेझ पाहायला मिळत आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी पहिल्याच दिवशी सिनेमागृहांमध्ये बरीच आगाऊ बुकिंग करण्यात आली आहे. या सगळ्यात ‘फायटर’चा पहिला रिव्ह्यूही समोर आला आहे.

‘फायटर’ हा चित्रपट नेमका कसा आहे याची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता लागून राहिली आहे. अशातच चित्रपटाचा पहिला रिव्ह्यू समोर आला असून प्रेक्षकांच्या या उत्सुकतेला पूर्णविराम मिळाला आहे. चित्रपट पाहता हृतिक रोशन, दीपिका पदुकोण व सिद्धार्थ आनंद यांची खूप प्रशंसा करण्यात आली आहे. आज २५ जानेवारी रोजी हा चित्रपट संपूर्ण जगभरात प्रदर्शित झाला आहे, फायटर हा वर्षातील पहिला बिग बजेट चित्रपट असून तो चित्रपटगृहांमध्ये दाखल झाला आहे. ‘फायटर’चा पहिला रिव्ह्यू ट्रेड एक्सपर्ट तरण आदर्श यांनी ट्विटरवरुन शेअर केला आहे.

आणखी वाचा – “स्वतःला हिंदू म्हणतो तेव्हा…”, धर्मावरुन गश्मीर महाजनीने शेअर केलेली पोस्ट चर्चेत, म्हणाला, “प्रत्येक धर्माला…”

#OneWordReview…#Fighter: BRILLIANT.
Rating: ⭐️⭐️⭐️⭐️½#War. #Pathaan. Now #Fighter. Director #SiddharthAnand scores a hat-trick… Aerial combat, drama, emotions and patriotism, #Fighter is a KING-SIZED ENTERTAINER, with #HrithikRoshan’s bravura act as the topping… JUST DON’T… pic.twitter.com/t9fmssfw2P

— taran adarsh (@taran_adarsh) January 24, 2024

तरणने आपल्या रिव्ह्यूमध्ये या चित्रपटाला साडेचार स्टार दिले आहेत. फायटर हा एक ‘विलक्षण’ चित्रपट असल्याचे वर्णन त्याने या रिव्ह्यूमध्ये केले आहे. तसेच हृतिक, दीपिका व अनिल कपूर यांच्या अभिनयाचेही कौतुक केले आहे. फायटर रिव्ह्यूबाबत तरणने लिहिले आहे की, “फायटर हा युक्तीने बनवलेला चित्रपट आहे. हा चित्रपट जसजसा उलगडत जातो तसतसा एक ठोस विधान करतो. काही निवडक दृश्य सोडले तर, हवाई पुनरागमनाचा भाग वा टाळ्या वाजवण्यायोग्य संवाद पाहता ही कलाकृती अप्रतिम आहे. फायटर जे वचन देतो ते पूर्ण करतो. त्यामुळे या चित्रपटाचा स्क्रीन अनुभवही मस्त आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, फायटर ही त्या शूर पुरुषांना खरी श्रद्धांजली आहे ज्यांनी निःस्वार्थपणे आपल्या देशाचे प्रभावीपणे संरक्षण केले आहे.

आणखी वाचा – “दुसऱ्या कोणाला तरी…”, ‘त्या’ व्यक्तीबरोबर अफेअर असल्याच्या चर्चा ऐकून कंगणा रणौत भडकली, म्हणाली, “थेट संबंध जोडता अन्…”

कामगिरीबद्दल बोलताना तरणने लिहिले की, “कोणतीही शंका न घेता, हृतिक रोशन प्रत्येकाला खुर्चीत खिळवून ठेवतो. तो अविश्वसनीय प्रामाणिकपणाने शौर्य, संयम व राग व्यक्त करताना दिसला आहे. चित्रपटातील प्रत्‍येक क्षण त्याने उत्‍कृष्‍ट अभिनयाने जिवंत केले आहेत. दीपिका पदुकोणने चित्रपटात आवश्‍यक भूमिका अतिशय उत्तमपणे निभावली आहे. चित्रपटातील सहाय्यक कलाकारांचे कौतुक करत त्याने पुढे लिहिले आहे की, “अनिल कपूर यांनी नेहमीप्रमाणे चित्रपटातील भूमिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत”.

Tags: bollywood moviedeepika padukonefighterfighter moviefighter movie reviewhritik roshan
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Varun Badola on ekta Kapoor serial
Entertainment

“कथा न बघता फक्त पैसे कमवत राहिली अन्…”, एकता कपूरवर भडकला सुप्रसिद्ध अभिनेता, तिच्याच मालिकांमध्ये काम करुनही…

जून 6, 2025 | 1:02 pm
Shiva Marathi Serial
Entertainment

‘शिवा’ मालिकेतील एकाचवेळी दोन कलाकारांच्या एक्झिट, भावुक पोस्ट शेअर करत सांगितलं कारण, म्हणाले…

जून 6, 2025 | 12:23 pm
Housefull 5 Review
Entertainment

Housefull 5 Review : ‘हाऊसफुल ५’ पाहावा की नाही?, प्रेक्षकांनी चित्रपटाचा ट्विस्टच सांगितला, खरंच तुफान गर्दी आहे का?

जून 6, 2025 | 11:53 am
Niranjan Kulkarni Wedding Video
Entertainment

‘आई कुठे…’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्याचं थाटामाटात लग्न, पारंपरिक पद्धतीने पार पडला विवाहसोहळा, लूकची चर्चा

जून 6, 2025 | 11:42 am
Next Post
Actress tejaswini pandit shared special post with raj thackeray video and says When will Maharashtra know this man? See the details

"हा माणूस महाराष्ट्राला कधी कळणार?", राज ठाकरेंचा व्हिडीओ शेअर करत तेजस्विनी पंडितची पोस्ट, जाती-धर्मावरुन भाष्य अन्…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.