लॉकडाऊनचा फटका हा सर्वच क्षेत्रांना मोठ्या प्रमाणात बसला होता. मराठी सिनेसृष्टी आणि नाट्यसृष्टीला याची झळ पोहचा होती. सोशल डिस्टसींगच्या नियमांमुळे नाटकाच्या तिकिट दरात मोठा फरक पडला आहे.

नाटकाला हवा तसा प्रेक्षकवर्ग लाभत नसल्याने अभिनेता प्रशांच दामले यांनी म्हत्वपूर्ण निर्णय घेतला. "अनेक नाट्यरसिकांनी मला संपर्क करून सांगितले की आम्हाला सहकुटुंब नाटक बघण्याची इच्छा आहे परंतु तिकीट दर जरा जास्त असल्यामुळे आम्ही पाहू शकत नाही. म्हणुनच मी असा निर्णय घेतला नाट्यगृहातील बालकनी तिकिट दर सुरुवातीला ३०० आणि नंतर २०० रुपये प्रति व्यक्ति होता, तो १०० रुपये करण्यात आला. प्रायोगिक तत्वावर दोन प्रयोगांच्या बाल्कनीचा दर हा १०० रुपये राहिल. 'तु म्हणशील तस'  प्रयोग क्र ९८  शुक्र दि २६ मार्च  रात्र ८:३० वा. आणि 'एका लग्नाची पुढची गोष्ट'  प्रयोग क्रमांक ४०० रविवार दिनां २८ मार्च  दु ४:३० वाजता 'प्रायोगिक तत्वावर फक्त गडकरी रंगायतन मध्ये अशी फेसबुक पोस्ट त्यांनी केलीय. मग प्रशांत दामले यांचा हा निर्णय तुम्हाला कसा वाटला हे कमेेंटमध्ये सांगा.