शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अखेर ‘तारक मेहता’मध्ये होणार दयाबेनची एंट्री? जेठालाल, बापूजींनी केला खुलासा, नव्या प्रोमोने वेधलं लक्ष

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
नोव्हेंबर 30, 2023 | 6:21 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah New Promo

अखेर 'तारक मेहता'मध्ये होणार दयाबेनची एंट्री? जेठालाल, बापूजींनी केला खुलासा, नव्या प्रोमोने वेधलं लक्ष

टेलिव्हिजनवरील लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ने आजवर प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. गेली अनेक वर्ष ही मालिका प्रेक्षकांना हसवत आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने आजवर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. अर्थात ही मालिका प्रेक्षकांना खळखळून हसायला भाग पाडतेय. या मालिकेतील दयाबेन हे पात्र प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडलं होतं. हे मात्र अभिनेत्री दिशा वकानी साकारत होती. मात्र मॅटर्निटी ब्रेक घेत दिशा वकानीने मालिकेतून एक्झिट घेतली. (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah New Promo)

दिशा वकानीने मालिकेतून एक्झिट घेताच प्रेक्षकांची नाराजी पाहायला मिळाली. बरेचदा दयाबेन मालिकेत परतणार असं सांगण्यात येत होतं. असं असलं तरी अद्यापही दयाबेन मालिकेत काही दिसली नाही. पण आता मात्र शोमध्ये दयाबेन परत येत असल्याचं सांगण्यात आलं आहे. याचा एक प्रोमोही समोर आला आहे. त्यामुळे आता दयाबेनची शोमध्ये एन्ट्री होणार असल्याचं मानलं जात आहे.

आणखी वाचा – “फक्त जातीमुळे ५ मुलींनी नाकारलं अन्…”, पृथ्वीक प्रतापने केला होता धक्कादायक खुलासा, म्हणालेला, “मी आडनाव…”

नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये असं पाहायला मिळत आहे की, दयाबेन इथे नसल्याने जेठालाल त्यांचे परम मित्र मेहता यांच्याबरोबर दयाबेनला आणण्यासाठी अहमदाबाद जाण्याचं ठरवतात. टप्पू त्यांना तिकीटदेखील बुक करुन देतो. पण जेठालालला त्याचवेळी पोलीस स्टेशनमध्ये जावं लागतं. यादरम्यान सुंदर जेठालालला फोन करून दयाबेनला गोकुळधाम सोसायटीमध्ये घेऊन येणार असल्याचं सांगतो. दयाबेन येणार असल्याचं ऐकून जेठालाल, टप्पू, बापूजी यांना आनंद झालेला पाहायला मिळत आहे.

View this post on Instagram

A post shared by TMKOC_Neela Film Productions (@taarakmehtakaooltahchashmahnfp)

आणखी वाचा – ३० वर्ष भाड्याच्या घरात राहिला ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम पृथ्वीक प्रताप, स्वकमाईतून द्यायचा तब्बल इतकं रुपये घरभाडं, आता घेतलं आहे स्वतःचं घर

मालिकेच्या नव्या प्रोमोवरून चाहत्यांमध्ये ही उत्सुकता वाढलेली पाहायला मिळत आहे. आता खरंच दयाबेन मालिकेत परतणार का की आधीप्रमाणे ही देखील अफवा ठरणार हे पाहणं रंजक ठरणार आहे. मागील ६ वर्षांपासून प्रेक्षक तिच्या कमबॅकच्या प्रतिक्षेत आहेत. त्यामुळे आता दयाबेन म्हणून मालिकेत दिशा वकानी परत येणार की याजागी कोणता नवा चेहरा पाहायला मिळणार हे पाहणंही उत्सुकतेचं असणार आहे.

Tags: new promotaarak mehtaTaarak Mehta Ka Ooltah Chashmahtmkoctv serial
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Next Post
marathi actress hemangi kavi shared facebook post for appreciating hemant dhome, nirrmite saawaant rinku rajguru and jhimma 2 movie

"मोठ्या वयाच्या अभिनेत्रींना...", 'झिम्मा २' पाहिल्यानंतर हेमंगी कवीने केलेलं वक्तव्य चर्चेत, म्हणाली "निर्मिती ताई तू कारणीभूत असशील कारण..."

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.