ज्येष्ठ शास्त्रीय गायिका माणिक भिडे यांचं आज वृद्धपकाळाने निधन झालं आहे. त्या ८८ वर्षांच्या होत्या. माणिक यांच्या निधनानंतर संपूर्ण संगीत विश्वाला मोठा धक्का बसला आहे. गेल्या काही वर्षांपासून त्या पार्किन्स या आजाराने त्रस्त होत्या. दरम्यान त्यांना अनेक शारिरीक वेदनाही सहन कराव्या लागल्या. या आजाराशी संबंधित त्यांच्यावर उपचारही सुरु होते. मात्र अखेरीस आज त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनानंतर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
१९३५मध्ये कोल्हापुर येथे माणिक भिडे यांचा जन्म झाला. संगीतक्षेत्राची आवड त्यांना अगदी लहानपणापासूनच होती. घरामधूनच त्यांना संगीताचा वारसा मिळाला. आई-वडिलांकडून त्यांना संगीतक्षेत्रामध्ये काम करण्यास अधिक पाठिंबा मिळाला. जयपूर-अत्रोली घराण्याचे उस्ताद अल्लादियाँ खाँ यांचे पुत्र उस्ताद मजी खाँ व भूर्जी खाँ साहेब यांच्या तालमीमध्ये मधुकरराव सडोलिकर तयार झाले.
आणखी वाचा – “एक स्वप्न पूर्ण…” महेश मांजरेकरांसाठी भूषण प्रधानची खास पोस्ट, म्हणाला, “प्रत्येक दिवशी मी…”
मधुकरराव सडोलिकर माणिक यांचे गुरु होते. गानसरस्वती किशोरी आमोणकरांच्या शिष्या म्हणून १७ वर्षांची त्यांची यशस्वी कारकिर्द होती. त्यानंतर माणिक यांनी त्यांची मुलगी अश्विनी भिडे यांच्यासह अनेक शिष्यांना घडवलं. त्यानंतर त्यांना गुरु ही पदवी मिळाली. माया धर्माधिकारी, प्रीती तळवलकर, ज्योती काळे, संपदा विपट, गीतीका वर्दे यांसारख्या अनेक गायिकांना माणिक भिडे यांनी घडवलं.
माणिक भिडे यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं. संगीतक्षेत्रातील उत्तम योगदानासाठी त्यांना भारतरत्न पं. भीमसेन जोशी जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.