Hina Khan Health Update : छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री हिना खान तिच्या आयुष्यातील कठीण काळातून जात आहे. सध्या अभिनेत्री स्तनाच्या कर्करोगाची बळी आहे. आणि तिच्या या आजारावर उपचार सुरु आहेत. या कठीण प्रसंगाला ती मोठ्या धैर्याने तोंड देत आहे. हिना खानचे चाहते तिच्यासाठी चिंतेत आहेत आणि तिच्या प्रकृतीसाठी सतत प्रार्थना करत आहेत. अभिनेत्री वेळोवेळी चाहत्यांबरोबर तिच्या तब्येतीबाबतचे अपडेट्स शेअर करत असते. सोशल मीडियावर ती नेहमीच सक्रिय असते. आणि नेहमीच तो सोशल मीडियाद्वारे चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. सध्या अभिनेत्री तिच्या कठीण काळातून जात असतानाचे अनेक अपडेट वेळोवेळी देत असते. अशातच अभिनेत्रीने रुग्णालयातील शेअर केलेल्या एका फोटोने साऱ्यांच्या नजरा वळविल्या आहेत.
हिना खानने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन दोन फोटो शेअर केले आहेत. यामध्ये ती हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये दिसत आहे. फोटोबरोबर हिनाने दिलेलं कॅप्शन साऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. हिनाने पोस्ट शेअर करत असं लिहिलं आहे की, “उपचारांच्या या कॉरिडॉरमधून उजळ बाजूकडे चालणे. एका वेळी एक पाऊल. कृतज्ञता कृतज्ञता आणि फक्त कृतज्ञता. आशीर्वाद”. सदर पोस्टनंतर चाहते हिना खानसाठी प्रार्थना करत आहेत आणि तिच्या धाडसाचे कौतुक करत आहेत. हिनाच्या पोस्टवर अनेक टेलिव्हिजन कलाकारांनी कमेंट केल्या आहेत.
आणखी वाचा – Pushpa 2 चित्रपटाला मोठा फटका, प्रदर्शित होताच ऑनलाइन लिक, निर्माते काय पाऊल उचलणार?
अभिनेत्री आरती सिंहने या पोस्टवर कमेंट करत लिहिले आहे की, “शेरनी, तुझ्यासाठी माझ्या मनापासून प्रार्थना. देव तुमच्या पाठीशी आहे, तो एका वेळी एक पाऊल तुमच्याबरोबर चालत आहे”. तर सुनील ग्रोवरने “लवकर बरे व्हा”, असे लिहिले आहे. तसेच अंकिता लोखंडेने “मी तुझ्यासाठी मनापासून प्रार्थना करत आहे”, अशी कमेंट केली आहे. उपचारादरम्यानही हिना खान कामाच्या आघाडीवर सक्रिय आहे. ती शूटिंग करत आहे. नुकतीच ती रॅम्प वॉक करताना दिसली. याशिवाय ती सहलीलाही जात आहे. हिना खानने सोशल मीडियावर तिच्या ट्रिपचे फोटो शेअर केले आहेत. तिचे धाडस पाहून यूजर्स तिला सलाम करत आहेत. अलीकडेच ती सलमान खानच्या ‘बिग बॉस १८’ च्या वीकेंड का वार एपिसोडमध्ये दिसली होती.
आणखी वाचा – वडिलांना कॅन्सर झाल्यानंतर सुप्रसिद्ध अभिनेत्रीकडे उपचारासाठीही पैसे नाहीत, मदतीचं आवाहन, भावुक व्हिडीओ समोर
हिना तिच्या आयुष्यातील प्रत्येक अपडेट चाहत्यांबरोबर शेअर करते. हिना खानने नुकतेच तिच्या तब्येतीबद्दल सांगितले, आता तिची तब्येत कशी आहे? हिना खान जेव्हा बिग बॉसच्या वीकेंड का वार एपिसोडच्या शूटिंगसाठी आली होती तेव्हा तिची भेट पापाराझींशी झाली. पॅप्सने विचारले, ‘तुझी तब्येत कशी आहे?’ अभिनेत्री म्हणाली, ‘चांगली आहे, मला तुमच्या प्रार्थनेत ठेवा”. यावेळी अभिनेत्री खूप हसताना दिसली. यावेळी तिने पापाराझींना सुंदर पोज दिल्या.