गेल्या अनेक वर्षांपासून ‘इट्स मज्जा’ने प्रेक्षकांच्या मनोरंजनाची हमी घेतली आहे आणि या हमीपूर्ततेसाठी ‘इट्स मज्जा’ कायमच प्रेक्षकांसाठी मनोरंजक आणि नवनवीन कलाकृती घेऊन येत असतात. गेल्या अनेक वर्षात ‘इट्स मज्जा’ प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी अशा अनेक नवनवीन कलाकृती घेऊन आल्या आहेत. मनोरंजन क्षेत्रातील विविधता ‘इट्स मज्जा’ने कायमच जपली असून याच विविधतेमुळे ‘इट्स मज्जा’ने अनेक चाहत्यांची मनं जिंकली आहेत. त्यामुळे चाहतेही ‘इट्स मज्जा’च्या प्रत्येक कलाकृतीसाठी वाट पाहत असतात. ‘इट्स मज्जा’ गेली अनेक वर्षे प्रेक्षकांसाठी मनोरंजन क्षेत्रातील प्रत्येक घडामोडी पोहोचवत आहेत. (itsmajja new series mhurta ceremony)
मनोरंजन क्षेत्रातील वार्तांकनाबरोबरच ‘इट्स मज्जा’ने आणखी एक पाऊल टाकले ते निर्मितीचे…. गेल्या वर्षभरात ‘इट्स मज्जा’ने ‘आठवी-अ’ आणि ‘पाऊस’ या लोकप्रिय सीरिजची यशस्वी निर्मिती केली आहे. त्यानंतर आता ‘इट्स मज्जा’ प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी आणखी एक सीरिज घेऊन येत आहे. नुकतंच या सीरिजचा मुहूर्त सोहळा संपन्न झाला आहे. ‘इट्स मज्जा’चे शौरीन दत्ता यांनी मुहुर्ताचा नारळ फोडत या नवीन सीरिजचा श्रीगणेशा केला. याचे काही खास क्षण सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत.
आणखी वाचा – Video : सूरज चव्हाणला भेटताच ‘ती’ मुलगी ढसाढसा रडू लागली अन्…; अजूनही झापुक झुपूकचं क्रेझ, व्हिडीओ व्हायरल
‘इट्स मज्जा’च्या या आगामी नवीन सीरिजमध्ये प्रेक्षकांना काय नवीन पाहायला मिळणार? या सीरिजमधून नक्की कोणता विषय मांडण्यात आला आहे? आणि या सीरिजमध्ये कोणते कलाकार पाहायला मिळणार? हे अद्याप गुलदस्त्यात आहे. तसंच ही नवीन सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला कधी येणार? याबद्दलची माहितीही अजून समोर आली नाही. पण ‘इट्स मज्जा’च्या ‘आठवी-अ’ आणि ‘पाऊस’ या सीरिजची लोकप्रियता पाहता प्रेक्षक आगामी सीरिजसाठीही उत्सुक आहेत हे नक्कीच…
आणखी वाचा – वडिलांना कॅन्सर झाल्यानंतर सुप्रसिद्ध अभिनेत्रीकडे उपचारासाठीही पैसे नाहीत, मदतीचं आवाहन, भावुक व्हिडीओ समोर
दरम्यान, काही दिवसांपूर्वी ‘इट्स मज्जा’ने ‘आठवी-अ’ ही सीरिज प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली. या सीरिजला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला. या सीरिजमध्ये डोंगरावरच्या छोट्याश्या खेडेगावातून हायस्कुलसाठी परगावी येणाऱ्या अभिजीत व त्यांच्या खास मित्रांची साधी तरी प्रत्येकाला आपलीशी वाटणारी प्रेक्षकांना भावली. त्यानंतर ‘इट्स मज्जा’ प्रेक्षकांसाठी ‘पाऊस’ ही सीरिज घेऊन आली. या वेबसीरिजमधून प्रेमाचं एक अल्लड नातं उलगडणाऱ्या सायली आणि विशालची लव्हस्टोरी प्रेक्षकांना चांगलीच भावली होती.