मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वाचा सन्मान मानल्या जाणाऱ्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराचं नुकतंच वितरण करण्यात आलं. त्यातील ‘एक दुआ’ या चित्रपटासाठी नॉन फीचर विभागात पुरस्कार मिळाला होता. या चित्रपटात अभिनेत्री ईशा देओलनेही प्रमुख भूमिकेत होती. ईशाने आजवर बरेच चित्रपट केले आहेत. त्यात ‘धूम’, ‘अनकही’, ‘इन्सान’, ‘कोई मेरे दिल से पूछे’, ‘नो एन्ट्री’ यांसारख्या बऱ्याच हिंदी चित्रपटात काम केलं आहे. यापैकी एक चित्रपट म्हणजे ‘प्यारे मोहन’. या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानचा किस्सा नुकताच ईशाने शेअर केला. टाईम्स ऑफ इंडिया दिलेल्या एका मुलाखतीत तिने सह-अभिनेत्री अमृता रावलच्या जोरदार कानाखाली मारली होती असा खुलासा केला. (Esha deol slapped amrita rao)
‘प्यारे मोहन’ हा चित्रपटच २००६ मध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटात ईशा देओलसह अभिनेत्री अमृता राव, अभिनेता विवेक ओबेरॉय व फरदीन खान हे कलाकार मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान ईशा व अमृता यांच्यात मतभेद झाले होते. दोघांचं बरंच मोठं भांडणही झालं होतं. हे भांडण इतकं वाढलं की अमृताने ईशाला शिवीगाळही केली. याचं प्रत्युत्तर म्हणून ईशाने अमृताच्या जोरदार कानाखाली लगावली होती.
मुलाखतीत खुलासा केला करत ईशा म्हणाली, ‘अमृताने दिग्दर्शक इंद्र कुमार व कॅमेरामॅनसमोर माझ्याबरोबर गैरवर्तन केलं. मला हे पूर्णपणे चुकीचं वाटलं. माझा स्वाभिमान व प्रतिष्ठेच्या रक्षणासाठी मी तिच्या कानखाली मारली. मला तिच्या कानाखाली चापट लावल्याच काहीच पश्चाताप नाही कारण अमृता ते डिजर्व करत होती.
ईशा पुढे सांगते, “मला माझ्या वागण्यावर कोणताही पश्चात्ताप नाही कारण त्यावेळी माझ्यासाठी ती आपल्या वागण्यासाठी पूर्णपणे पात्र होती. मी फक्त माझ्या स्वाभिमानासाठी उभी राहिले. अमृताने नंतर माझी माफीही मागीतली होती. मी तिला माफ केलं आहे. आता आमच्याच सगळ्या गोष्टी ठीक आहेत”, असं सांगत तिने हा किस्सा स्पष्ट केला.