बुधवार, सप्टेंबर 2, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

लग्नापूर्वीच एकत्र राहत आहेत अमृता देशमुख व प्रसाद जवादे?, दसऱ्यानिमित्त शेअर केलेल्या फोटोंमध्ये दिसली ‘ती’ गोष्ट, फोटो व्हायरल

Majja Webdeskby Majja Webdesk
ऑक्टोबर 25, 2023 | 5:22 pm
in Entertainment
Reading Time: 5 mins read
google-news
Prasad amruta share new house glimps

Prasad amruta share new house glimps

‘बिग बॉस’ मराठीच्या चौथ्या पर्वातून प्रकाशझोतात आलेली जोडी म्हणजे अभिनेत्री अमृता देशमुख व अभिनेता प्रसाद जवादे. या जोडीने ‘बिग बॉस’ मराठीमधून प्रेक्षकांच्या मनात आपली वेगळी जागा मिळवली. बिग बॉसचा हा सिझन गाजवल्यानंतर घरातून बाहेर पडून त्यांनी फोटो शेअर करत चाहत्यांना त्यांच्या प्रेमाची कबुली दिली. त्यानंतर त्यांनी लवकरच लग्न करणार असल्याचं सांगत चाहत्यांना आश्चर्याचा सुखद धक्का दिला होता. त्यामुळे ही जोडी आता लवकरच आयुष्यभराचे साथीदार बनणार आहेत. नोव्हेंबरचा लग्नाचा मुहुर्त ठरला असून नुकताच त्यांच्या चहा पोह्यांचा कार्यक्रमही थाटात पार पडला. लग्नापूर्वींच्या विधींनाही आता सुरुवात झाली आहे. त्यातील एक विधी म्हणजे केळवण. त्यांचे फोटो या जोडप्याने सोशल मीडियावर शेअर केले होते. आता त्यांनी नवीन एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. सध्या त्या फोटोची सोशल मीडियावर बरीच चर्चा रंगली आहे. (Prasad amruta share new house glimps)

अमृता व प्रसाद नोव्हेंबरच्या १८ तारीखेला विवाहबंधनात अडकणार आहेत. त्यांच्या चाहत्यांना त्यांच्या लग्नाची उत्सुकता तर लागून आहेच पण त्यापेक्षा जास्त नुकताच त्यांनी शेअर केलेल्या इन्स्टाग्रामवरील फोटोबाबत आणखीनच उत्सुकता वाढली आहे. अमृता व प्रसादने त्यांच्या नवीन घराचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ते दोघं एकमेकांबरोबर घराच्या बाहेर उभे असलेले दिसून येत आहेत. दरवाजाही खूप छान प्रकारे सजवण्यात आला आहे.

View this post on Instagram

A post shared by Amruta Deshmukh (@khwabeeda_amruta)

आणखी वाचा – Video : ‘जीभ वापरून बाण …’, रावण दहनाला गेलेल्या कंगन राणौतकडून घडली चूक, नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

झेंडूच्या फुलांचं व आंब्याच्या पानांचं तोरण लावून पारंपारिक पद्धतीने प्रवेश दरवाजा सजवला आहे. घरात दसरा स्पेशल पूजाही केली आहे. या सगळ्यात प्रवेशद्वाराच्या बाजूला लावलेल्या नावांच्या पाट्यांवर सर्वात जास्त लक्ष केंद्रित करतो आहे. त्यांच्या बिग बॉसच्या घरातील नावाच्या पाट्या त्यांच्या घराबाहेर नेमप्लेट म्हणून लावल्या आहेत.

View this post on Instagram

A post shared by Amruta Deshmukh (@khwabeeda_amruta)

आणखी वाचा – Video : …अन् भाऊ कदमांना पाहताच आदित्य ठाकरेंनी मिळवला हात, गरबा कार्यक्रमाच्या ‘त्या’ व्हिडीओने वेधलं लक्ष

त्यांच्या जोडीला तर चाहत्यांकडून भरभरून प्रेम मिळतच असतं. पण या फोटोंना आणि त्या नेमप्लेटला चाहत्यांकडून विशेष प्रेम मिळत आहे. या फोटोंवरही चाहत्यांनी लाईक व कमेंटचा वर्षाव केला आहे. एका नेटकऱ्याने लिहीलं, ‘त्या नावाच्या अधिक शोभा देत आहेत’. तर दुसऱ्या नेटकऱ्याने, ‘एकदम नारंगी, पिवळ्या झेंडूची फुलांसारखेच तुम्ही दिसतात’, असं लिहीत त्यांनी या जोडप्याचं कौतुक केलं आहे.  

Tags: amruta deshmukhmarathi actormarathi actressnew house glimpsprasad jawade
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Aali Mothi Shahani Teaser
Entertainment

हृता दुर्गुळे आणि सारंग साठ्ये यांच्या ‘आली मोठी शहाणी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

सप्टेंबर 1, 2026 | 1:04 pm
Paach Footacha Bachchan
Entertainment

कीर्तन विश्व उलगडणाऱ्या ‘पाच फुटाच्या बच्चन’चा टीजर समोर, दिसणार तगड्या कलाकारांची फौज

सप्टेंबर 1, 2026 | 11:20 am
 Badshah and Isha Rikhi announced Divorce
Entertainment

पाच महिन्यानंतच संसार मोडला, सुप्रसिद्ध गायकाचा घटस्फोट, लग्नापूर्वी चार वर्ष केलं एकमेकांना डेट अन्…

सप्टेंबर 1, 2026 | 7:58 am
Rajat Bedi Marathi Movie
Entertainment

बॉलिवूडनंतर रजत बेदींची मराठी सिनेमात एन्ट्री; ‘बंधू’ चित्रपटातून नवी इनिंग

ऑगस्ट 31, 2026 | 4:24 pm
Next Post
Richard Roundtree passed away

हॉलिवूड अभिनेते रिचर्ड राऊंडट्री काळाच्या पडद्याआड, कर्करोगाशी झुंज ठरली अपयशी

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.