बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत सध्या तिच्या ‘तेजस’ चित्रपटमुळे बरीच चर्चेत आहे. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण त्याअगोदर कंगनाने मोठा इतिहास रचला आहे. काल दिल्लीत मोठ्या उत्साहात रावण दहनाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी ५० वर्षांच्या इतिहासात रावण दहन करणारी कंगना ही पहिली महिला अभिनेत्री ठरली. पण या सोहळ्यात कंगनाकडून एक मोठी चुक झाली. सध्या त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे. या व्हिडीओवरून कंगाना बरीच ट्रोल होत आहे. (Kangana ranaut get trolled for the ramleela video)
कंगना मंगळवारी दिल्लीत झालेल्या रामलीलमध्ये रावण दहन करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. यादरम्यानचा रावण दहनचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत कंगना रावणावर बाण चालवताना दिसत आहे. यावेळी तिचे लावलेले तिन्ही निशाणे चुकले. तिने ‘जय श्री राम’ हा नारा लावत तीन वेळा बाण चालवला पण तिन्ही वेळा तिचे प्रयत्न व्यर्थ ठरले. त्यानंतर कमिटीच्या एका सदस्याने तिला तीर चालवण्यात मदत केली आणि रावण करण्यास मदत केली.
Real life kangna
— AKSHAT JAIN (@AkshatJ12205226) October 25, 2023
बाण चले ना चले पर नवाबी न घटे#Dussehra #KanganaRanaut #LuvKushRamleela #RavanDahan #ravan #Dhanush pic.twitter.com/sXOMVD2uV1
हा व्हिडीओ सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे. या व्हिडीओवरून कंगना बरीच ट्रोल होताना दिसते आहे. एक नेटकरी लिहीतो, ‘आता असे लोक रावण दहन करतील हे देशाचं दुर्देव आहे’. तर दुसरा नेटकरी लिहीतो, ‘तोंडाने चालव खूप लांबपर्यंत जाईल’ तर एकाने लिहीलं की, ‘जीभ वापरून बाण मारणं किती सोपं आहे. मी पहिल्यांदाच सुर्पणकेला रावणाचा वध करताना पाहत आहे. अगोदर चित्रपटातून, नाटकातून, कॉमेडीतून व आता हिंदू सणांमधून…’ अशी कमेंट करत नेटकरी तिला बरंच ट्रोल करत आहेत.
Reel Life Kangana Vs Real Life Kangana ????????
— ???????????????????? ???????????????????? ???????????????????????? (@BeingSumit007) October 25, 2023
Saheb ki cheli ????????
Kangana Ranaut claims she does stunts better than Tom Cruise
????????????????
Neither here nor there…the arrow did not fire.
No problem…well only truth can kill untruth.#Dussehra #KanganaRanaut
Wish you all a very Happy… pic.twitter.com/OucRpO9ECf
कंगनाचा ‘तेजस’ चित्रपट २७ ऑक्टोबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात कंगना मुख्य भूमिकेत असून एअरफोर्स पायलट तेजस गीलच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाची तिच्या चाहत्यांना बरीच उत्सुकता लागून राहिली आहे.