शुक्रवार, जुलै 24, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सगळ्यांसमोरच ऐश्वर्या रायला ‘प्लास्टिक’ म्हणाला होता इमरान हाश्मी, पुन्हा भाष्य करत म्हणाला, “इंडस्ट्रीमध्ये शत्रू…”

Kshitij Lokhandeby Kshitij Lokhande
नोव्हेंबर 17, 2023 | 4:31 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Emraan Hashmi talks about after controversial statement

सगळ्यांसमोरच ऐश्वर्या रायला ‘प्लॅस्टिक’ म्हणाला होता इमरान हाश्मीने, पुन्हा भाष्य करत म्हणाला, “इंडस्ट्रीमध्ये शत्रू…”

बॉलिवूड अभिनेता इमरान हाश्मी नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. नुकतंच सलमान खानचा ‘टायगर ३’ चित्रपट प्रदर्शित झाला असून हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटात इमरानने खलनायकाची भूमिका साकारली, ज्याचं चाहत्यांनी प्रचंड कौतुक केलं आहे. इमरान जितका त्याच्या चित्रपटांमुळे चर्चेत येतो, तितकाच तो त्याच्या सीरिअल किसर या प्रतिमेमुळे आणि वक्तव्यांमुळे चर्चेत राहतो. एकीकडे त्याच्या चित्रपटाची चर्चा होत असताना आता आणखी एका कारणांमुळे तो पुन्हा चर्चेत आला आहे. (Emraan Hashmi talks about after controversial statement)

इमरानने काही वर्षांपूर्वी करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या शोमध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी त्याने ऐश्वर्या रायबद्दल एक वादग्रस्त वक्तव्य केलं, ज्याची बरीच चर्चा झाली होती. दरम्यान, जेव्हा इमरानने हे वक्तव्य केल्यानंतर अनेकांनी त्याच्यावर बरीच टीका केली होती. त्यानंतर अखेर त्याला माफी मागावी लागली होती. आता बऱ्याच वर्षानंतर अभिनेत्याने दिलेल्या एका मुलाखतीत या प्रकरणावर मोठा खुलासा केला.

हे देखील वाचा – “तुझी साऊथ इंडियन गर्लफ्रेंड आहे?”, चाहत्याने गश्मीर महाजनीला विचारला थेट प्रश्न, अभिनेता म्हणाला, “तिनेच मला…”

इमरान हाश्मीने नुकतंच ‘झूम टीव्ही’ला मुलाखत दिली. ज्यात त्याने ऐश्वर्याबद्दल केलेल्या वक्तव्यावर बोलताना करण जोहरच्या शोमध्ये पुन्हा न येण्याचं कारण सांगितलं. काही वर्षांपूर्वी करणच्या शोमधील एका एपिसोडमध्ये इमरान दिग्दर्शक महेश भट्ट यांच्याबरोबर सहभागी झाला होता. तेव्हा त्याने ऐश्वर्या राय बच्चनचा ‘प्लास्टिक’ असा उल्लेख केला होता. त्यानंतर त्याच्यावर बरीच टीका करण्यात आली होती. जेव्हा इमरानला पुन्हा ‘कॉफी विथ करण’ मध्ये का जात नाही? असा प्रश्न विचारला असता तो यावर म्हणाला, “या गोष्टी सांभाळणे फारच कठीण आहे, ज्यामुळे इंडस्ट्रीत तुमचे शत्रू वाढतात. जर मी पुन्हा या शोमध्ये गेलो, तर मी अशाच प्रकारचं वक्तव्य करून आणखी गोंधळ होऊ शकतो. बहुतेक रॅपिड फायर राऊंडमध्ये माझी अवस्था पहिल्यापेक्षा अधिकच बिकट होऊ शकते. या इंडस्ट्रीत माझा कोणी शत्रू नाही. केवळ त्या शोमधील भेटवस्तू मला मिळावी, यासाठी अशी उत्तरे द्यावी लागतात.”

हे देखील वाचा – Bigg Boss 17 : “विकी गेम खेळतोय पण तू…”, अंकिता लोखंडेवर भडकला सलमान खान, म्हणाला, “तुझं फक्त…”

View this post on Instagram

A post shared by Emraan Hashmi (@therealemraan)

दरम्यान, या वादग्रस्त वक्तव्याच्या काही दिवसांनी इमरानने ऐश्वर्याची माफी मागितली होती. तेव्हा तो म्हणाला होता की, “मी ऐश्वर्याचा मोठा चाहता असून मला कोणाला दुखावण्याचा हेतू नव्हता. हा या शोचा फॉरमॅट होता, जिथे तुम्हाला गिफ्ट मिळवण्यासाठी अश्या प्रकारची उत्तरे द्यावी लागतात. मी ऐश्वर्याच्या कामाचा प्रचंड आदर करतो.”

Tags: Aishwarya Rai Bachchanbollywood newsemraan hashmiEmraan Hashmi talks about after controversial statement
Kshitij Lokhande

Kshitij Lokhande

Latest Post

Bhootam Bhayam
Entertainment

‘भूतम भयम्’मध्ये आणखी एक सरप्राईज, प्रियदर्शन जाधव साकारतोय रहस्यमय ‘मया’

जुलै 24, 2026 | 5:20 pm
Bhagyashree Nhavale Periods Awareness
Entertainment

“मी अजूनही बाजूला बसते”, मासिक पाळीबाबत अभिनेत्रीने मांडली तिची बाजू, म्हणाली, “देवाला जाणं…”

जुलै 24, 2026 | 11:11 am
salman khan appeal students at jantar mantar
Entertainment

“कृपया घरी परत जा”, जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सलमान खानचे भावनिक आवाहन, म्हणाला, ” पंतप्रधान मोदी…”

जुलै 24, 2026 | 10:15 am
parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Next Post
gashmeer mahajani talk about hindi serial offer

“आताच्या टॉप मालिका…”, हिंदी मालिकांबाबत गश्मीर महाजनीचं मोठं भाष्य, म्हणाला, “मला भूमिकांसाठी ऑफर होती पण…”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.