प्रत्येक क्षेत्रात स्ट्रगल हे असतंच. तसंच सिनेसृष्टीतील कलाकारांसाठीही स्ट्रगल काही नवा नाही. कलाकारांना कलाक्षेत्रात स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण करण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागते. प्रत्येकाच्या स्ट्रगल मागची कथा मनाला चटका लावून जाते. अभिताभ बच्चन यांच्यापासून ते सलमान खान यांच्यापर्यंत सगळ्यांनाच काम मिळवण्यासाठी बरीच धडपड करावी लागली. ( Luv Sinha Recalls Shatrughan Sinha)
बरेच कलाकार त्यांचा कठीण काळ तसेच संघर्षमय प्रवास याबाबत बोलताना दिसतात. अशातच शत्रुघ्न सिन्हा यांचा मुलगा लव सिन्हानेही आपल्या वडिलांच्या कठीण काळाबाबत भाष्य केलं आहे.
‘गदर २’ चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान लवने त्याच्या वडिलांबाबत काही खुलासे केले.
पाहा शत्रुघ्न सिन्हा यांच्याबद्दल लव सिन्हा काय म्हणाला ( Luv Sinha Recalls Shatrughan Sinha)

“आज माझे वडील ज्या ठिकाणी पोहोचले आहेत तिथपर्यंतचा त्यांचा प्रवास सोपा नव्हता. इथपर्यंत पोहोचण्यासाठी खूप कठीण प्रसंगांना त्यांना सामोरं जावं लागलं. खाण्यासाठी देखील पैसे नव्हते तेव्हा त्यांना मैलोनमैल प्रवास करावा लागायचा”.
भावुक होत लव म्हणाला, “काही वेळा असेही प्रसंग आले आहेत की, जेव्हा माझ्या वडिलांना खाणं आणि बस प्रवास यापैकी एक गोष्ट निवडायला लागायची. तेव्हा ते पैसे वाचवण्यासाठी मैलोनमैल पायी चालत जायचे आणि काही वेळा ते पैसे वाचवण्यासाठी उपाशीही रहायचे”.
”वडिलांनी चित्रपटांत करिअर करण्यासाठी आपलं घरही सोडलं होतं. वडिलांना त्यांच्या करिअरविषयी भीतीदेखील वाटत होती. अपयशाची भीती त्यांना सतावत होती. पण कुटुंबाला त्यांच्याकडून खुप अपेक्षा होत्या. कुटुंबियांचा अपेक्षा भंग त्यांना करायचा नव्हता”. आता ‘गदर २’मधील लवची भूमिका प्रेक्षकांना आवडणार का? तसेच वडिलांप्रमाणेच प्रेक्षकांचं लवलाही प्रेम मिळणार का? हे पाहावं लागेल.