मंगळवार, जून 9, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Taali Trailer : “ताली बजाऊँगी नहीं, बजवाऊँगी”, बहुचर्चित ‘ताली’चा अंगावर काटा आणणारा ट्रेलर प्रदर्शित, सुश्मिता सेनच्या कामाचं होतंय कौतुक

Majja Webdeskby Majja Webdesk
ऑगस्ट 7, 2023 | 3:38 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Taali trailer

Taali Trailer : “ताली बजाऊँगी नहीं, बजवाऊँगी”, बहुचर्चित ‘ताली’चा अंगावर काटा आणणारा ट्रेलर प्रदर्शित, सुश्मिता सेनच्या कामाचं होतंय कौतुक

Taali Trailer : अभिनेत्री सुश्मिता सेन काही काळ अभिनयक्षेत्रामधून ब्रेक घेतला. सुश्मिताचं काम पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक झाले होते. काही महिन्यांपूर्वीच तिने तिच्या ‘ताली’ या वेबसीरिजची घोषणा केली. तिथपासूनच तृतीयपंथीयांच्या आयुष्यावर आधारित या वेबसीरिजची चर्चा सुरु झाली. ‘ताली’चं पोस्टर व टीझर प्रदर्शित झाल्यानंतर ट्रेलरकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं होतं. अखेर या सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ‘ताली’चा ट्रेलर पाहून प्रेक्षक भारावून गेले आहेत. (Sushmita Sen Play Transgender)

‘ताली’च्या ट्रेलरमध्ये सुश्मिताचा तृतीयपंथीच्या भूमिकेतील अंदाज विशेष लक्ष वेधून घेणारा आहे. तृतीयपंथी लोकांसाठी झटणाऱ्या, त्यांच्यासाठी सतत काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या गौरी सावंत यांच्यावर ही वेबसीरिज आधारित आहे. सुश्मिता या सीरिजमध्ये श्रीगौरी सावंत यांचीच भूमिका साकारत आहे. ट्रेलरमध्ये सुश्मिताच्या तोंडी असलेले संवाद विशेष चर्चेत आले आहेत.

आणखी वाचा – “बाबांकडे कामंच नव्हतं कारण…”, नितीन देसाईंच्या मृत्यूनंतर मुलीची पहिली प्रतिक्रिया, रडत म्हणाली, “महाराष्ट्र शासनाला…”

तृतीयपंथी व्यक्तींचं चालणं, बोलणं, त्यांची देहबोली तसेच लूक यावर सुश्मिताने विशेष अभ्यास केला असल्याचं ट्रेलरमधून दिसतं. शिवाय तृतीयपंथीयांच्या हक्कासाठी लढणाऱ्या गौरी सावंत यांच्या संघर्षाची झलक या ट्रेलरमध्ये दिसत आहे. काही मिनिटांमध्येच या ट्रेलरला अधिकाधिक व्ह्युज मिळाले आहेत.

आणखी वाचा – “मासिक पाळी असताना देवळात जावसं वाटतं जा पण…” हेमांगी कवीची पोस्ट चर्चेत, नेटकरी म्हणतात, “धर्माच्या बाबतीत…”

मराठी अभिनेता सुव्रत जोशीचीही ट्रेलरमध्ये झलक दिसत आहे. तृतीयपंथीयांच्या वेशामध्ये सुव्रत दिसत आहे. तर हेमांगी कवीही या सीरिजमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत असेल. दिग्दर्शक रवी जाधव यांनी या सीरिजच्या दिग्दर्शनाची जबाबदारी पेलली आहे. ‘जिओ सिनेमा’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ही सीरिज येत्या १५ ऑगस्टपासून प्रेक्षकांना पाहता येईल.

Tags: bollywood actressentertainment newssushmita senwebseries
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Jennifer Winget Wedding
Entertainment

घटस्फोटाच्या १२ वर्षांनी टीव्ही अभिनेत्रीची लगीनघाई, सिंगापूरच्या उद्योगपतीसह बांधणार लग्नगाठ

जून 8, 2026 | 2:02 pm
vivek dahiya divyanka tripathi kids
Entertainment

लग्नाच्या १० वर्षांनी जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर केली त्यांची पूजा, दोन्ही आजी-आजोबाही उपस्थित, बाळाची झलक

जून 8, 2026 | 12:00 pm
pepsi sharma passes away
Entertainment

हरियाणवी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कलाकार काळाच्या पडद्याआड, अचानक छातीत दुखू लागलं आणि…

जून 8, 2026 | 10:02 am
Communication In Relationships
Lifestyle

लग्नाच्या किती वर्षांनी बहुतेक घटस्फोट होतात?, नात्यात दुरावा निर्माण होण्याची ही आहेत कारणं, जाणून घ्या…

जून 7, 2026 | 12:05 pm
Next Post
( Tharal Tar Mag Update)

'ठरलं तर मग' मालिकेतून मीरा जगन्नाथची एक्झिट, साक्षीच्या भूमिकेत झळकणार 'ही' अभिनेत्री

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.