मंगळवार, सप्टेंबर 1, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘रॉकी और रानी की प्रेम कहाणी’मधील धर्मेंद्र यांच्या किसिंग सीनवर सनी देओलचं मोठं वक्तव्य, म्हणाला, “माझे बाबा या वयात…”

Kshitij Lokhandeby Kshitij Lokhande
ऑगस्ट 7, 2023 | 1:14 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Sunny Deol on Dharmendra Kissing Scene

'रॉकी और रानी की प्रेम कहाणी'मधील धर्मेंद्र यांच्या किसिंग सीनवर सनी देओलचं मोठं वक्तव्य, म्हणाला, "माझे बाबा या वयात…"

७० च्या दशकात अनेक सुपरहिट चित्रपट देणारे बॉलीवूडमधील ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र सध्या जोरदार चर्चेत आहेत. याचे कारण आहे ते नुकतंच प्रदर्शित झालेला ‘रॉकी और रानी की प्रेम कहाणी’ चित्रपटात त्यांचा व अभिनेत्री शबाना आझमी यांचा गाजलेला किसिंग सीन.

दिग्दर्शक करण जोहरच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहाणी’ चित्रपटातून ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांनी बऱ्याच काळानंतर मोठ्या पडद्यावर परतले असून त्यांच्या या भूमिकेला प्रेक्षकांचा प्रतिसाद तर मिळालाच, शिवाय त्यांचा आणि शबाना आझमी यांच्यातील किसिंग सीनमुळे सगळीकडे हा चर्चेचा विषय बनला आहे. अशातच धर्मेंद्र यांच्या किसिंग सीनवर त्यांचा मुलगा व अभिनेता सनी देओल याने मोठं वक्तव्य केलं आहे. (Sunny Deol on Dharmendra Kissing Scene)

हे देखील वाचा – Rocky Aur Rani Ki Prem Kahani : धर्मेंद्र यांच्याबरोबर शबाना आझमी यांचं ऑनस्क्रीन किस, जावेद अख्तर म्हणाले, “या महिलेला मी…”

अभिनेता सनी देओल याबद्दल बोलताना म्हणाला, “माझे वडील काहीही करु शकतात. मी तर म्हणेन की ते एकमेव अभिनेते आहेतच, जे या वयात असं करू शकतात. मी अद्याप वडिलांचा सिनेमा पाहिलेला नाही. मी जास्त सिनेमे पाहत नाही. एवढंच काय तर माझे अनेक सिनेमे देखील मी पाहिले नाहीत. त्यामुळे मी यावर माझ्या वडिलांशी कसं बोलणार ? ते एक असे व्यक्तिमत्त्व आहे, जे त्यांच्या नम्रता आणि प्रामाणिकपणामुळे सर्व काही कॅरी करू शकतात.” (Sunny Deol on Dharmendra Kissing Scene)

हे देखील वाचा – ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’मध्ये या दिग्गज नटांचा इंटिमेट सीन पाहून प्रेक्षकांना बसला धक्का

अभिनेता सनी देओलचा २००१ मध्ये आलेला ‘गदर’चा सिक्वेल ‘गदर २’ चित्रपट लवकरच चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. येत्या ११ ऑगस्टला चित्रपट प्रदर्शित होणार असून तब्बल २२ वर्षांनंतर तारा सिंगचा ॲक्शनपॅक अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

Tags: dharmendragadar 2 movierocky aur rani ki prem kahanisunny deol
Kshitij Lokhande

Kshitij Lokhande

Latest Post

Rajat Bedi Marathi Movie
Entertainment

बॉलिवूडनंतर रजत बेदींची मराठी सिनेमात एन्ट्री; ‘बंधू’ चित्रपटातून नवी इनिंग

ऑगस्ट 31, 2026 | 4:24 pm
Jayanti 2 Trailer
Entertainment

‘जयंती २’मधून उलगडणार कॉलेजमधील भेदभावाची गोष्ट, ट्रेलर पाहून वाढली उत्सुकता, ११ सप्टेंबरपासून जवळच्या सिनेमागृहात

ऑगस्ट 31, 2026 | 12:49 pm
Nikki Arbaaz breakup news
Entertainment

निक्की-अरबाजमध्ये नेमकं काय बिनसलं?, एकमेकांना अनफॉलो केलं अन्…; पोस्टमुळे चर्चांना उधाण

ऑगस्ट 31, 2026 | 10:22 am
Heavy Weight Lifting
Entertainment

कोणत्या प्रकारच्या व्यायामामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो? जाणून घ्या आणि व्हा सावध

ऑगस्ट 29, 2026 | 10:14 am
Next Post
Supriya Pathare New Hotel

आधी होता फुडट्रक आता सुप्रिया पाठारेंच्या मुलाने सुरु केलं स्वतःचं हॉटेल, मराठी कलाकारांची उद्घाटनाला हजेरी

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.